अक्षय कुमारला ‘नमो टीव्ही’चा अँकर बनवा : ओवेसी

भिवंडी : पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाख घेणाऱ्या अभिनेता अक्षय कुमारला ‘नमो टीव्ही’चा अँकर बनवा, अशा शब्दात एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केला. भिवंडीत वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार डॉ. अरुण सावंत यांच्या प्रचारासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांची सभा झाली. या सभेतून आंबेडकर आणि ओवेसी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. […]

अक्षय कुमारला 'नमो टीव्ही'चा अँकर बनवा : ओवेसी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM

भिवंडी : पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाख घेणाऱ्या अभिनेता अक्षय कुमारला ‘नमो टीव्ही’चा अँकर बनवा, अशा शब्दात एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केला. भिवंडीत वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार डॉ. अरुण सावंत यांच्या प्रचारासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांची सभा झाली. या सभेतून आंबेडकर आणि ओवेसी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. भिवंडीतील टावरे स्टेडियम येथे वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

ओवेसी अक्षय कुमारला काय म्हणाले?

खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी अभिनेता अक्षय कुमारचा समाचार घेतला. ओवेसी म्हणाले, “मोदींनी अभिनेत्याला मुलाखत दिली. मोदींच्या मते टीव्ही अँकर चांगली मुलाखत घेत नाहीत. त्यामुळे अभिनेता अक्षय कुमार याला मुलाखत घेण्यासाठी बोलवलं.” तसेच, ओवेसी पुढे म्हणाले, “हा अभिनेता अक्षय कुमार विचारतो, तुम्ही आंबा कसा खाता, कापून की चोखून, हा काय प्रश्न झाला? याला नमो टीव्हीचा अॅकर बनवा.”

मोदी डरपोक : ओवेसी

“भारताला इराणकडून पेट्रोल खरेदीसाठी अमेरिकेने मनाई केली. त्यावर मोदी अमेरिकेच्या राष्ट्रपतीला म्हणतात, ‘ठीक आहे बॉस’. याचाच अर्थ असा आहे की, मोदी डरपोक असून ते अमेरिकेला घाबरतात. अन् आम्हाला सांगतात की घर में घूस के मारेंगे? कसली तुमची 56 इंचाची छाती? आम्ही तर ट्रम्पला तर सोडा कोण्याच्या बापालाही घाबरत नाही.” अशी घणाघाती टीका असदुद्दीन ओवेसी यांनी मोदींवर केली.

भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिने शहीद हेमंत करकरेंबद्दल अपशब्द वापरले. मात्र भाजप अशा व्यक्तींवर कोणतीही कारवाई करत नाही. त्यामुळे अशा देशद्रोही प्रवृत्तींना महाराष्ट्राच्या नागरिकांनी हद्दपार केले पाहिजे, असे आवाहन देखील ओवेसी यांनी या सभेप्रसंगी केले.

पाहा व्हिडीओ :

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.