Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सक्तीच्या वीज बिलवसुली विरोधात 19 तारखेला राज्यभर सर्वपक्षीय आंदोलन करणार, राजू शेट्टींची घोषणा

सक्तीच्या वीज बिलवसुली विरोधात 19 मार्च रोजी राज्यभर सर्वपक्षीय आंदोलन करणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. | Raju Shetti electricity bill

सक्तीच्या वीज बिलवसुली विरोधात 19 तारखेला राज्यभर सर्वपक्षीय आंदोलन करणार, राजू शेट्टींची घोषणा
राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
Follow us
| Updated on: Mar 13, 2021 | 3:31 PM

कोल्हापूर : सक्तीच्या वीज बिलवसुली विरोधात 19 मार्च रोजी राज्यभर सर्वपक्षीय आंदोलन करणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली आहे. सरकारकडून अचानक सक्ती केली जातेय. सर्वसामान्यांनी पैसे कुठून आणायचे?, असा सवाल त्यांनी यानिमित्ताने उपस्थित केलाय. (all party agitation on the 19th against electricity bill collection Says Raju Shetti)

कोल्हापुरात सर्वपक्षीय बैठक संपन्न

कोल्हापुरात सक्तीच्या वीज वसुली विरोधात सर्वपक्षीय बैठक पार पडली. बैठकीत आंदोलनाची दिशा स्पष्ट झाली आहे. सक्तीच्या वीज बिल वसुलीच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

राज्य सरकार अशी अचानक सक्ती करुच कसं शकतं?, असं म्हणत दोन मंत्र्यांच्या भांडणात सर्वसामान्य जनतेचा जीव जातोय. अशी अचानक सक्ती केली जातेय तर पैसे आणायचे कुठून? त्यामुळे ग्राहकांना वीज बिल भरायला एक महिन्याचा वेळ द्यायला हवा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

राज्यभर सर्वपक्षीय आंदोलन

लॉकडाऊन काळातील वीज बिल सरकारने माफ करावे ही मागणी आमची आजही ठाम आहे. 19 मार्चला महाराष्ट्रात पाहिल्यांदा शेतकऱ्यांची आत्महत्या झाली होती. त्यामुळे त्याच दिवशी राज्यभर आंदोलन केले जाणार आहे, असंही राजू शेट्टी यांनी सांगितलं

19 मार्चच्या आंदोलनात सर्वसामान्य जनतेचा रोष दिसेल. सर्वसामान्यांमध्ये बीजबिलावरुन सरकारवर नाराजी आहे. सरकारने ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी, असंही राजू शेट्टी म्हणाले.

राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करा: राजू शेट्टी

राज्यातील शेतकऱ्यांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केली. वीजबिल माफीशिवाय आम्ही माघार घेणार नाही. एकाही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन तोडू देणार नाही, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला होता.

लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांचं घरगुती वीजबिल माफ करावं, अशी भूमिका घेऊन जून महिन्यापासून आम्ही सातत्याने आंदोलन करत आहोत. शहरी असो किंवा ग्रामीण असो, महाराष्ट्रातील 1 कोटी 35 लाख कुटुंबांना लाभ मिळू शकतो. ही माफी घेतल्याशिवाय गप्प बसायचं नाही, ही आमची भूमिका आहे, असंही राजू शेट्टी यांनी सांगितलं होतं. आजही ते या मागणीवर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं.

(all party agitation on the 19th against electricity bill collection Says Raju Shetti)

हे ही वाचा :

सरकारमध्ये दम असेल तर वीज बिलाची वसुली करुन दाखवावीच; राजू शेट्टींचे आव्हान

जे काही ठरलं असेल ते मला माहित नाही, वीजबिल वसुलीवर अजित पवारांचं उत्तर

बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा.