मराठा आरक्षणासंदर्भातील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; चंद्रकांत पाटलांच्या नावाचा उल्लेख
tv9 मराठी ऑडिओ क्लिप ची पुष्टी करत नाही. चंद्रकांत पाटलांनी सदर ऑडिओ क्लिप बद्दल विचारला असता सर्व आरोप फेटाळलेले आहेत.
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भातील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिप चंद्रकांत पाटलांच्या नावाचा उल्लेख आहे. मराठा क्रांती मोर्चामध्ये फुट पाडल्याचा आरोप या क्लिपमध्ये करण्यात आला आहे. tv9 मराठी ऑडिओ क्लिप ची पुष्टी करत नाही. चंद्रकांत पाटलांनी सदर ऑडिओ क्लिप बद्दल विचारला असता सर्व आरोप फेटाळलेले आहेत.
पैशांच्या देवाण-घेवाण झाल्याचा ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख झाल्याचे ऐकायला मिळत आहे. मात्र, स्पष्टपणे याबाबत बोलले गेले नाही. चंद्रकांत पाटलांनी सदर ऑडिओ क्लिप करण्यात आलेले आरोप फेटाळले आहे. हा सर्व बदनामी करण्याचा कट असल्याचे पाटील यांनी म्हंटले आहे.
मराठा क्रांती मोर्चा सनन्वयक आभा पाटील यांची प्रतिक्रिया
मराठा आंदोलनाच्या वेळी 2019 मधील माझ्या एका सहकार्यासोबत संभाषण केलं होतं त्यावेळी राज्यभर आंदोलन सुरू होते. या आंदोलनाच्या वेळी काही संघटना काही समन्वयक यांच्यात वादविवाद निर्माण झाले होते. यावेळी आरोप प्रत्यारोप त्यावेळी झाले होते आणि त्यावेळेला पुन्हा सर्व आरोपांचं खंडण करण्यात आलं होते.
तो विषय त्यावेळी पूर्णपणे संपलेला होता परंतु आता या गोष्टीचं भांडवल करून काही विरोधक मंडळी या संभाषणाचा वापर राजकारणासाठी करत आहेत. यामध्ये कोणावरच आरोप नाहीत. हा विषय 2019 मध्येच संपलेला आहे यामुळे अशा कोणत्या गोष्टीला कोणी खतपाणी घालून राजकारण करण्याचा प्रयत्न करु नये ही विनंती.