विस्तार, खातेवाटपानंतर अखेर मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप; गिरीश महाजनांना फडणवीसांच्या शेजारचा बंगला, वाचा संपूर्ण यादी

सत्तांतरानंतर काही माजी मंत्र्यांनी बंगले रिकामे केले नव्हते. त्यामुळे नव्या मंत्र्यांना बंगले देण्यात अडचणी येत होत्या. अखेर अनेक बंगले रिकामे झाल्यानंतर नवनिर्वाचित मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप करण्यात आलं आहे.

विस्तार, खातेवाटपानंतर अखेर मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप; गिरीश महाजनांना फडणवीसांच्या शेजारचा बंगला, वाचा संपूर्ण यादी
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 3:49 PM

मुंबई : शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराला (Cabinet Expansion) महिना लागला. विस्तारानंतर पाच दिवसांनी खातेवाटप जाहीर झालं. त्यानंतर आता अखेर मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप करण्यात आलं आहे. विस्तार आणि खातेवाटपाला वेळ लागल्यानं विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) जोरदार टीका केली होती. तर सत्ताधाऱ्यांकडूनही विरोधकांना उत्तरं देण्यात येत होती. त्यानंतर आज मंत्र्यांना बंगल्याचं (Ministers Bungalow) वाटप करण्यात आलं आहे. सत्तांतरानंतर काही माजी मंत्र्यांनी बंगले रिकामे केले नव्हते. त्यामुळे नव्या मंत्र्यांना बंगले देण्यात अडचणी येत होत्या. अखेर अनेक बंगले रिकामे झाल्यानंतर नवनिर्वाचित मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप करण्यात आलं आहे.

  1. राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष – शिवगिरी
  2. राधाकृष्ण विखे-पाटील – रॉयलस्टोन
  3. सुधीर मुनगंटीवार – पर्णकुटी
  4. चंद्रकांत पाटील – अ-9 (लोहगड)
  5. गिरीश महाजन – सेवासदन
  6. गुलाबराव पाटील – जेतवन
  7. संजय राठोड – शिवनेरी
  8. सुरेश खाडे – ज्ञानेश्वरी
  9. संदिपान भुमरे – ब-2 (रत्नसिंधू)
  10. उदय सामंत – मुक्तागिरी
  11. रविंद्र चव्हाण – अ – 6 (रायगड)
  12. अब्दुल सत्तार – ब – 7 (पन्हाळगड)
  13. दीपक केसरकर – रामटेक
  14. अतुल सावे – अ – 3 (शिवगड)
  15. शंभूराज देसाई – ब – 4 (पावनगड)
  16. मंगलप्रभात लोढा – ब – 1 (सिंहगड)

शिंदेंच्या मंत्रिमंडळात महिलांना स्थान मिळणार, 2 नावं चर्चेत

मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील 9 तर भाजपच्या 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या 18 मंत्र्यांमध्ये एकाही महिला आमदाराला स्थान मिळालं नाही. त्यावरुन विरोधकांसह स्वपक्षातील महिला नेत्यांकडूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा झाली. त्यानंतर अखेर शिंदे-फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात महिलांना स्थान मिळणार असल्याचं स्पष्ट झालंय. मिळालेल्या माहितीनुसार दोन महिला आमदारांना मंत्रिपद दिलं जाणार आहेत. त्यात एक कॅबिनेट तर एक राज्यमंत्रीपद दिलं जाणार असल्याची चर्चा आहे.

देवयानी फरांदे, माधुरी मिसाळ या दोन नावांची जोरदार चर्चा आहे. देवयानी फरांदे या नाशिकच्या आमदार आहेत. तर माधुरी मिसाळ या पुण्याच्या आहेत. तर मनिषा चौधरी आणि सीमा हिरे या दोघींचीही नावं चर्चेत आहेत. मनिषा हिरे या नाशिकच्या आहेत. विशेष म्हणजे या चारही महिला नेत्या या भाजपच्या आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.