AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खैरेंबद्दल विचारलं अन् दानवे भडकले, संतापून हात जोडला अन्…नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगरातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचं बोललं जातं. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

खैरेंबद्दल विचारलं अन् दानवे भडकले, संतापून हात जोडला अन्...नेमकं काय घडलं?
chandrakant khaire and ambadas danve (1)
Follow us
| Updated on: Apr 17, 2025 | 5:36 PM

Ambadas Danve : छत्रपती संभाजीनगरातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचं बोललं जातं. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. हा वाद घेऊन खैरे थेट मातोश्रीपर्यंत गेले होते. दरम्यान, आता हा वाद मिटला असल्याचं खैरेंनीच स्पष्टीकरण दिलं होतं. तरीदेखील या दोन्ही नेत्यांमध्ये पूर्मपणे समेट घडून आली नसल्याचा दावा केला जातो. असे असतानाच आता अंबदास दानवे यांनी खैरेंबद्दल प्रश्न विचारताच संताप व्यक्त केलाय. त्यांनी आम्ही आमच्या पक्षाला पाहण्यास सक्षम आहोत. कृपया काड्या करणं बंद करावं, असं संतापून म्हटलंय.

दानवे चांगलेच संतापले, नेमकं काय म्हणाले?

अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरात एक पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी चंद्रकांत खैरे या पत्रकार परिषदेसाठी का उपस्थित नाहीत, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना दानवे चांगलेच संतापले. “मला वाटतं तुम्ही काड्या करणं बंद करा. मी स्पष्टपणे सांगतो. ही शिवसेना नेत्यांची बैठक आहे. काल-परवा खैरे साहेबांनी सगलं सांगितलेलं आहे. मी तर काहीही बोललेलो नाही. काड्या करणं बंद करावं. मी हात जोडून विनंती करतो. आम्ही आमच्या पक्षाला पाहण्यास सक्षम आहोत,” असं म्हणत दानवेंनी राग व्यक्त केला. तसेच पत्रकारांनी बातम्या छापायच्या असतील तर छापाव्या नाहीतर छापू नये. एवढं स्पष्टपणे मी सांगत आहे. आम्ही माहिती द्यायला आलो आहोत, असंही दानवे संतापात म्हणाले.

दानवे, खैरे काय म्हणाले होते?

दरम्यान, 16 एप्रिला रोजी नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात खैरे यांनी सबुरीची भूमिका घेत वाद मिटला, असं म्हटलं होतं. मराठवाड्यातील मेळावा छोटा होता त्यामुळे कदाचित त्यांनी मला बोलावलं नाही. मी दोन पावलं मागे यायला तयार आहे. दानवेंनी भाषणात जे म्हटलं ते प्रत्यक्षात केलं तर संघटना वाढीस मदत होईल, असं खैरे म्हणाले होते. तसेच माझ्याकडून तर कोणताही वाद नाही. मी खैरे यांचे दर्शन घेतले, असे म्हणत आमच्यात कोणताही वाद नसल्याचं दानवे यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं होतं.

पहलगाममध्ये पर्यटकांना सुखरूप ठेवणारा 'तो' देवदूत टिव्ही ९ मराठीवर
पहलगाममध्ये पर्यटकांना सुखरूप ठेवणारा 'तो' देवदूत टिव्ही ९ मराठीवर.
पहलगामच्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हाशिम मुसा, NIAचा रिपोर्ट
पहलगामच्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हाशिम मुसा, NIAचा रिपोर्ट.
पाकवर सर्जिकल स्ट्राईक करण्यास USचा ग्रीन सिग्नल? अ‍ॅक्शन घ्यावी, पण..
पाकवर सर्जिकल स्ट्राईक करण्यास USचा ग्रीन सिग्नल? अ‍ॅक्शन घ्यावी, पण...
भारत - पाकिस्तान अटारी सीमेवरील दरवाजे पुन्हा उघडले
भारत - पाकिस्तान अटारी सीमेवरील दरवाजे पुन्हा उघडले.
LPG Gas : मे महिन्याच्या सुरुवातीलाच Good News... गॅस सिलिंडर स्वस्त
LPG Gas : मे महिन्याच्या सुरुवातीलाच Good News... गॅस सिलिंडर स्वस्त.
रायगडचं पालकमंत्रिपद गावगुंडाकडे नको, राऊतांचा नाव न घेता गोगावलेंना
रायगडचं पालकमंत्रिपद गावगुंडाकडे नको, राऊतांचा नाव न घेता गोगावलेंना.
चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले
चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले.
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार.
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई.
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी.