भाजपमधून मनसेत गेलेल्या उमेदवाराने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याच्या डोक्यात दगड घातला

राज ठाकरेंना शिवीगाळ केल्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची कबुली आरोपी सुमेध भवार यांनी दिली आहे.

भाजपमधून मनसेत गेलेल्या उमेदवाराने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याच्या डोक्यात दगड घातला
Follow us
| Updated on: Jan 21, 2020 | 8:09 AM

अंबरनाथ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवीगाळ केल्याने मनसेच्या विधानसभा उमेदवाराने   राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याच्या डोक्यात दगड (Ambernath NCP worker beaten) घातला. अंबरनाथमध्ये शनिवारी रात्री हा प्रकार घडल्याची माहिती आहे. आरोपी सुमेध भवार यांनी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपला रामराम ठोकून मनसेमध्ये प्रवेश केला होता.

राज ठाकरेंना शिवीगाळ केल्यामुळे मारहाण केल्याची कबुली सुमेध भवार यांनी दिली आहे. सुमेध भवार भाजपमध्ये असताना मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला होता. त्यामुळे त्यांनी मनसेमध्ये जाऊन विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी भवार यांच्याकडे सचिन अहिरेकर हे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होते. मात्र भवार मनसेत गेल्यानंतर अहिरेकर यांनी भवार यांच्याकडे काम करणं बंद केलं होतं.

सुमेध भवार यांनी शनिवारी सचिन अहिरेकर यांना अंबरनाथच्या महात्मा गांधी शाळेजवळ भेटायला बोलावलं. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. यावेळी सुमेध भवार आणि त्यांच्या अंगरक्षकांनी आपल्या डोक्यात दगड घालून मारहाण केल्याचा आरोप अहिरेकर यांनी केला आहे. अहिरेकर हे सध्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष आहेत.

हेही वाचा : राष्ट्रीय प्रतीक मतांची भीक मागण्यासाठी नाही, मनसेच्या नव्या झेंड्यावर संभाजी ब्रिगेडचा आक्षेप

अहिरेकर यांनी आपल्याला आणि राज ठाकरे यांना शिवीगाळ केली. तसंच आपल्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळेच त्यांच्या डोक्यात दगड घातल्याचा दावा सुमेध भवार यांनी केला आहे. या प्रकरणी भवार आणि त्यांच्या साथीदारांवर अंबरनाथ पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अद्याप कुणालाही अटक झालेली नाही.

अंबरनाथमध्ये मनसेतील इच्छुकांना डावलून ऐनवेळी भाजपतून आलेल्या सुमेध भवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे पक्षातील एक मोठा गट नाराज झाला होता. नाराजांपैकी काही जण शिवसेनेचा छुपा प्रचार करत असल्याच्या तक्रारीही वरिष्ठांकडे (Ambernath NCP worker beaten) गेल्या होत्या.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.