Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmaveer: ‘ही उद्धव ठाकरेंची सेन्सॉरशिप नाही तर दुसरं काय?’ ‘धर्मवीर’चा व्हिडीओ पोस्ट करत अमेय खोपकरांचा सवाल

आज सकाळी (मंगळवार) त्यांनी ट्विटरवर 'धर्मवीर' (Dharmaveer) या चित्रपटातील दोन व्हिडीओ पोस्ट केले. 'धर्मवीर' आनंद दिघे यांचा आवाज दाबणाऱ्या वृत्तीचा कडक शब्दात निषेध, असं म्हणत त्यांनी चित्रपटातील दोन दृश्यांचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

Dharmaveer: 'ही उद्धव ठाकरेंची सेन्सॉरशिप नाही तर दुसरं काय?' 'धर्मवीर'चा व्हिडीओ पोस्ट करत अमेय खोपकरांचा सवाल
'धर्मवीर' आनंद दिघे यांचा आवाज दाबणाऱ्या वृत्तीचा कडक शब्दात निषेध, असं म्हणत खोपकरांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 28, 2022 | 2:55 PM

मनसे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी सोमवारी एक सूचर ट्विट करून सर्वांची उत्कंठा वाढवली होती. ‘असा हा धर्मवीर.. एक राज की बात उद्या शेअर करणार आहे. पिक्चर अभी बाकी है,’ या त्यांच्या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. आज सकाळी (मंगळवार) त्यांनी ट्विटरवर ‘धर्मवीर’ (Dharmaveer) या चित्रपटातील दोन व्हिडीओ पोस्ट केले. ‘धर्मवीर’ आनंद दिघे यांचा आवाज दाबणाऱ्या वृत्तीचा कडक शब्दात निषेध, असं म्हणत त्यांनी चित्रपटातील दोन दृश्यांचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. Zee5 वर चित्रपट दाखवताना त्यातील राज ठाकरेंचे (Raj Thackeray) संवाद गायब झाल्याचा आरोप खोपकरांनी केला आहे. ही उद्धव ठाकरेंची सेन्सॉरशिप नाही तर दुसरं काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित झाला होता. दिवंगत शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची प्रचंड चर्चा झाली. आनंद दिघेंच्या आयुष्यातील महत्त्वाची पानं या चित्रपटातून उलगडण्यात आली होती. यातील राज ठाकरेंचा सीन सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. दिघे आणि राज ठाकरे यांच्या भेटीचा तो व्हिडीओ आहे. आनंद दिघे आणि राज यांच्यामध्ये हॉस्पिटलच्या भेटीत हिंदुत्वावर चर्चा झाली होती. या भेटीदरम्यानचा राज ठाकरेंबद्दलचा दिघे यांचा संवाद Zee5 वरून काढून टाकण्यात आला आहे. हाच व्हिडीओ अमेय खोपकरांनी शेअर केला आहे.

हे सुद्धा वाचा

अमेय खोपकर यांची पोस्ट-

‘खालील दोन्ही व्हिडीओ काळजीपूर्वक बघा. ‘धर्मवीर’जेव्हा Zee5 वर येतो तेव्हा राजसाहेबांबद्दलचं वाक्य का गायब होतं? ही उद्धव ठाकरेंची सेन्सॉरशिप नाही तर दुसरं काय? राजसाहेबांच्या लोकप्रियतेला टरकणाऱ्या शिवसेनेचा खरा चेहरा उघड झालाय,’ असं ट्विट करत त्यांनी दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

पहा व्हिडीओ-

चित्रपटगृहात दाखवलेला संवाद

राज ठाकरे- धर्मवीर, अहो हिंदुत्वाचं काम अजून सर्वदूर पोहोचलं नाहीये. असं पडून राहून कसं चालेल आनंद दिघे- ती जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर आहे. आम्ही म्हातारे, थकलो राज ठाकरे- अहो, तसं असेल तर असं ठणठणीत म्हातारपण सगळ्यांच्याच नशिबी येवो

Zee5 वर दाखवलेला संवाद

राज ठाकरे- धर्मवीर, अहो हिंदुत्वाचं काम अजून सर्वदूर पोहोचलं नाहीये. असं पडून राहून कसं चालेल आनंद दिघे- आम्ही म्हातारे, थकलो राज ठाकरे- अहो, तसं असेल तर असं ठणठणीत म्हातारपण सगळ्यांच्याच नशिबी येवो

एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना फोन

गुवाहाटीत बंडखोर शिवसेना आमदारांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदेंनी राज ठाकरे यांना फोन केल्याची माहिती आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसंच दोन वेळा या दोघांमध्ये फोन कॉल झाला तेव्हा राजकीय चर्चाही झाल्याची माहिती समोर आली आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.