उद्या शपथविधी, पण अद्याप निमंत्रण नाही, तरीही आठवले म्हणतात मी उद्या शपथ घेणार!

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला स्थान मिळणार याची उत्सुकता देशभरात आहे. गुरुवारी म्हणजेच उद्या मोदींचा शपथविधी होत आहे. मात्र रिपाई नेते रामदास आठवले यांना अद्याप भाजपकडून अद्याप फोन किंवा आमंत्रणच आलेलं नाही. स्वत: रामदास आठवले यांनीच ही माहिती टीव्ही 9 मराठीला दिली. मला अमित शाह यांचा फोन आलेला नाही, पण तो येईल […]

उद्या शपथविधी, पण अद्याप निमंत्रण नाही, तरीही आठवले म्हणतात मी उद्या शपथ घेणार!
Follow us
| Updated on: May 29, 2019 | 2:35 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला स्थान मिळणार याची उत्सुकता देशभरात आहे. गुरुवारी म्हणजेच उद्या मोदींचा शपथविधी होत आहे. मात्र रिपाई नेते रामदास आठवले यांना अद्याप भाजपकडून अद्याप फोन किंवा आमंत्रणच आलेलं नाही. स्वत: रामदास आठवले यांनीच ही माहिती टीव्ही 9 मराठीला दिली.

मला अमित शाह यांचा फोन आलेला नाही, पण तो येईल अशी खात्री आहे. अपेक्षा आहे.कारण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली NDA चे सरकार आले पाहिजे, दलित आणि अल्पसंख्याकांची मते मिळाली पाहिजेत यासाठी महाराष्ट्रात आणि देशात मी प्रयत्न केला होता. मला दिलेल्या खात्याची जबाबदारी मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडलेली आहे. प्रचारात आघाडीवर राहिलो होतो. त्यामुळे मला मंत्रिपदाची अपेक्षा आहे, असं रामदास आठवले म्हणाले.

मी मिळेल ती जबाबदारी स्वीकारणार आहे. कॅबिनेट असेल, स्वतंत्र प्रभार असेल किंवा राज्यमंत्री पद ते मी आता सांगू शकत नाही. माझ्या कामाचा विचार करून मोदी मला न्याय देतील अशी अपेक्षा आहे. बाबासाहेब आणि नेहरूंच्या मंत्रिमंडळानंतर मोदींनी संधी दिली, बाबाहेबांचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी नरेंद्र मोदींच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची माझी तयारी आहे, असं रामदास आठवले म्हणाले.

माझी मुख्यमंत्री आणि गडकरी यांच्याशी चर्चा झाली आहे. खात्याबद्दल चर्चा नाही, पण मंत्रिमंडळात घ्यावे असे त्यांना सांगितले आहे. नरेंद्र मोदी सर्व अँगलने विचार करीत आहेत. युवकांना संधी मिळाली पाहिजे. युवक NDA च्या bjp च्या बाजूने आहेत, असं रामदास आठवले यांनी सांगितलं.

भाजपकडून संपर्क झालेला नाही, पण तो होईल. माझं नाव नक्की मंत्रिमंडळ यादीत असेल, उद्या माझा शपथविधी होईल याची मला खात्री आहे, असं रामदास आठवलेंनी नमूद केलं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.