मोदींची बारामतीतून माघार, आता अमित शाहांची सभा होणार

बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बारामतीत होणारी सभा अचानक रद्द करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींऐवजी आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे बारामतीत सभा घेतील. येत्या 19 एप्रिल रोजी अमित शाह बारामतीत सभा घेणार आहेत. बारामतीतून शिवसेना-भाजप युतीकडून कांचन कुल मैदानात आहेत. बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान खासदार सुप्रिय सुळे रिंगणात आहेत. सुप्रिया सुळेंविरोधात भाजपने […]

मोदींची बारामतीतून माघार, आता अमित शाहांची सभा होणार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बारामतीत होणारी सभा अचानक रद्द करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींऐवजी आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे बारामतीत सभा घेतील. येत्या 19 एप्रिल रोजी अमित शाह बारामतीत सभा घेणार आहेत. बारामतीतून शिवसेना-भाजप युतीकडून कांचन कुल मैदानात आहेत.

बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान खासदार सुप्रिय सुळे रिंगणात आहेत. सुप्रिया सुळेंविरोधात भाजपने मोठ्या प्रमाणात प्रचार सुरु केला आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना तर थेट बारामतीच्या पालकपदी नियुक्ती केली आहे. बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यातही पवार कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे 2014 साली मोदी लाटेतही राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे इथून विजयी झाल्या होत्या.

यंदा भाजपने आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. कांचन कुल या अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नातेवाईकही आहेत. त्यामुळे काहीशी कौटुंबिक किनारही इथल्या लढतीला आहे.

शरद पवारांपासून बारामतीचं नातं असल्याने, राष्ट्रवादीला इथे पराभूत करणं भल्याभल्यानं जमलं नसल्याचे चित्र आहे. मात्र यंदा भाजपने बारामतीत अक्षरश: कंबर कसली आहे. त्यामुळे लढत चुरशीची झाली आहे.

त्यात भाजपने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच सभा आयोजित करण्याचे ठरवले होते. मात्र, ऐनवेळी पंतप्रधान मोदींची सभा रद्द करुन, भाजपाध्यक्ष अमित शाह यांची सभा आयोजित केली आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत भाजप नेत्यांची काल रात्री एक बैठक झाली. व्यस्त वेळापत्रकामुळे पंतप्रधान मोदींनी बारामतीची सभा रद्द केल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे.

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.