Amit Thackeray : अमित ठाकरेंनी घेतली नितेश राणेंची भेट, कोकणातल्या राजकारणात नवं समीकरण?

अनेक ठिकाणी मनसे आणि भाजपमध्ये युती होण्याचीही शक्यता आहे. असे झाल्यास राज्याच्या राजकारणात नवा मोड येऊ शकतो. याचा फायदा दोन्ही पक्षांना आगामी निवडणुकीत होऊ शकतो.

Amit Thackeray : अमित ठाकरेंनी घेतली नितेश राणेंची भेट, कोकणातल्या राजकारणात नवं समीकरण?
अमित ठाकरेंनी घेतील नितेश राणेंची भेटImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 5:33 PM

मुंबई : एकीकडे शिवसेनेत मोठा राजकीय भूकंप झाला असताना दुसरीकडे अमित ठाकरे (Amit Thackeray) हे सध्या कोकण पिंजून काढत आहे. अमित ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. कोकणाच्या राजकारणात सध्या नवी समीकरणं तयार होताना दिसत आहे. कारण मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांची भेट घेतलीय. आता ठाकरे पुत्र (Raj Thackeray) आणि राणे पुत्र भेटल्यावर या भेटीची चर्चा तर होणारच. आगामी काळात अनेक महत्वाच्या निवडणुका आहेत. त्यासाठी मनसेने आत्तापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. अनेक ठिकाणी मनसे आणि भाजपमध्ये युती होण्याचीही शक्यता आहे. असे झाल्यास राज्याच्या राजकारणात नवा मोड येऊ शकतो. याचा फायदा दोन्ही पक्षांना आगामी निवडणुकीत होऊ शकतो.

ठाकरे-राणे भेट चर्चेत

कोकणातल्या राजकारणात मोठा बदल?

राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या भेटीला पोहोचल्याने आता कोकणाच्या राजकारणात काय बदल होणार? असाही सावल विचारण्यात येत आहे. काही तासांआधीच राणेंच्या कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी अमित ठाकरे पोहोचले होते.अमित ठाकरे यांचा कोकण दौरा हा बऱ्याच दिवसांचा असून आजच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशीच ठाकरे यांनी सर्वांना धक्का देत नितेश राणेंची भेट घेतली. या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र संघटनेच्या कामासाठी दौऱ्यावर असलेल्या या भेटीगाठीत राजकीय होणार नाही असे होणारच नाही. दोघांमध्ये झालेल्या चर्चेचा मजकूर मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे.

राणेंकडून ठाकरेंचं स्वागत

अमित ठाकरे यांच्या अन्य भेटी

अमित ठाकरे यांच्या राजकीय भेटींचा सपाटा हा सध्या कोकणात सुरू आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमितजी ठाकरे यांच्या मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियानाचा शुभारंभ मंगळवारी सकाळी सावंतवाडी येथे झाला. श्री. अमितजी ठाकरे यांनी सावंतवाडी येथील मँगो हॉटेल सभागृहात संवाद बैठका घेतल्या, अशी माहिती मनसेच्या ट्विटरवरून देण्यात आली आहे. आता या भेटीगाठी राजकारणाची समीकरणं कशी बदलणार? हे तर आगामी काळातच कळेल.

मनसेचे ट्विट

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.