नांदेडमधून अशोक चव्हाणही नाही, राहुल गांधीही नाही, तिसरा उमेदवार ठरला?
नांदेड : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीसह देशातील दोन जागांवरुन लोकसभा निवडणूक लढतील, अशी चर्चा सुरु आहे. त्यातील दुसरी जागा महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघ असेल, असे आडाखे राजकीय वर्तुळात बांधले जात असताना, यात आणखी वेगळी माहिती समोर आली आहे. नांदेडमधून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे विद्यमान खासदार आहेत. या जागेवरुन […]
नांदेड : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीसह देशातील दोन जागांवरुन लोकसभा निवडणूक लढतील, अशी चर्चा सुरु आहे. त्यातील दुसरी जागा महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघ असेल, असे आडाखे राजकीय वर्तुळात बांधले जात असताना, यात आणखी वेगळी माहिती समोर आली आहे. नांदेडमधून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे विद्यमान खासदार आहेत. या जागेवरुन अशोक चव्हाण यांच्या पत्नी आमदार अमिता चव्हाण यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.
नांदेडमधून राहुल गांधी लढण्याची चर्चा
2014 साली मोदी लाट असतानाही महाराष्ट्रात काँग्रेस ज्या दोन जागा जिंकल्यात, त्यातली एक जागा नांदेडची होती. इथून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे जिंकले होते. शिवाय, नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेससाठी सर्वात सुरक्षित मानली जाते. त्यामुळे या जागेवरुन राहुल गांधी यांच्या नावाची चर्चा होती.
अमिता चव्हाण कोण आहेत?
अमिता चव्हाण या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी आहेत. नांदेडमधील भोकर विधानसभा मतदारसंघातून अमित चव्हाम या आमदार आहेत. भाजपच्या डॉ. माधवराव किन्हळकर यांचा अमिता चव्हाण यांनी 2014 साली पराभव केला होता. आता नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून अमिता चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे.
नांदेड काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला
नांदेड लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदार संघ आहेत. त्यापैकी नांदेड दक्षिणवर शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांचा विजय झाला होता. तर मुखेड विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार गोविंद राठोड यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र तुषार राठोड विजयी झाले होते. तर अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या देगलूरमधून शिवसेनेचे सुभाष साबने हे आमदार आहेत. तर उरलेल्या नांदेड उत्तर, भोकर, आणि नायगावात काँग्रेसचे आमदार आहेत. हे तिन्ही मतदारसंघ काँग्रेसचे गड आहेत.
वाचा – नांदेड लोकसभा : अशोक चव्हाणांची यंदा मुख्यमंत्रीपदासाठी बॅटिंग