VIDEO : धर्मवीर की स्वराज्यरक्षक? अजितदादांच्या वक्तव्यावर खासदार अमोल कोल्हे यांची पहिली प्रतिक्रिया
विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेले वक्तव्य सध्या वादात सापडले आहे. यावर आता खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : राज्यात सध्या विरोधीपक्ष नेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी केलेले छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल केलेले एक वक्तव्य चर्चेत आहे. भाजपकडून यावर टीका सुरु आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याविरोधात निषेध आंदोलनं देखील सुरु आहेत. यावर आता खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे ( Amol Kolhe ) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ( Amol kolhe first reaction on ajit pawar controversial statement )
अमोल कोल्हे काय म्हणाले?
‘अजितदादांनी अधिवेशन काळात वक्तव्य केल्यानंतर ही चर्चा सुरु झाली आहे. स्वराज्यरक्षक मालिका करत असताना मला जे जाणवलं ते मी मांडत आहे. इतिहासाचा तर्कशुद्धीने विचार करायला हवा. छत्रपती शंभुराजे यांनीच लिहिलेला ग्रंथ पाहिला तर त्यात त्यांनी धर्माची उत्तम चिकित्सा केली आहे. त्यांनी त्यावर श्लोक रचला आहे.’
‘जबरदस्तीने ज्यांचं धर्मांतरण झालं. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं पुन्हा एकदा हिंदू धर्मात शुद्धीकरण करुन हिंदू धर्मात स्वागत केलं होतं. संभाजी महाराजांनी नेहमी हा कित्ता गिरवला. जबरदस्तीने आणलेल्या धर्मांतरावर त्यांनी बंदी आणली होती.’
धर्मवीर ही उपाधी का लागली?
‘छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान दिलं. धर्मासाठी बलिदान दिलं याचा अभ्यास केला तर याचे काही पुरावे आहे. त्यामध्ये काही इतिहासकारांनी जे काही लिहून ठेवलं आहे. त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलंय की, औरंगजेब बादशाहने शंभुराजेंनी बंदी केल्यानंतर २ प्रश्न विचारले होते.’
‘स्वराज्याच्या खजिना कुठे आहे आणि औरंगजेबाची कोणती लोकं शंभुराजांना शामिल आहेत. असं चारही इतिहासकार नमुद करतात. धर्मांतर करायला त्यांनी नकार दिला याचा कुठेही आधार नाही.’