फडणवीसांचं राजकारण इतकं खुनशी असेल वाटलं नव्हतं, खडसेंच्या राजीनाम्यानंतर ‘राष्ट्रवादीची तोफ’ धडाडली
चार दशकं ज्यांनी पक्ष वाढवला त्या नेत्यांना असा त्रास? केंद्राने गंभीर दखल घ्यावी" अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरींनी दिली आहे.
मुंबई : “एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर मांडलेले मुद्दे ऐकून धक्का बसला. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण इतकं खुनशी असेल याची यापूर्वी कधी कल्पना केली नव्हती” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे. खडसे येत्या शुक्रवारी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार आहेत. (Amol Mitkari reacts on Devendra Fadnavis after Eknath Khadse resigns)
“देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण इतकं खुनशी असेल, याची यापूर्वी कधी कल्पना केली नव्हती. आज एकनाथ खडसे साहेबांनी अंतःकरणपूर्वक जे मुद्दे पत्रकार परिषदेत मांडले ते ऐकून धक्का बसला. चार दशकं ज्यांनी पक्ष वाढवला त्या नेत्यांना असा त्रास? केंद्राने गंभीर दखल घ्यावी” अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरींनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण इतकं खुनशी असेल याची यापूर्वी कधी कल्पना केली नव्हती. आज एकनाथ जी खडसे साहेबांनी अंतःकरण पुर्वक जे मुद्दे पत्रकार परिषदेत मांडले ते ऐकुन धक्का बसला. चार दशकं ज्यांनी पक्ष वाढवला त्या नेत्यांना असा त्रास? केंद्राने गंभीर दखल घ्यावी.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) October 21, 2020
“अबीर, गुलाल, उधळीत रंग l “नाथा ” घरी नाचे माझा सखा पांडुरंग ll राष्ट्रवादी पक्षात एका मजबूत नेतृत्वाचे एक कार्यकर्ता म्हणून मनःपूर्वक स्वागत.. (अनेक अहंकारी नेते पुन्हा तोंडावर आपटले. ईश्वर त्यांना सावरण्याचे बळ देवो )” असे ट्वीट मिटकरी यांनी आधी केले होते.
अबीर, गुलाल, उधळीत रंग l “नाथा ” घरी नाचे माझा सखा पांडुरंग ll राष्ट्रवादी पक्षात एका मजबुत नेतृत्वाचे एक कार्यकर्ता म्हणुन मनःपूर्वक स्वागत.. (अनेक अहंकारी नेते पुन्हा तोंडावर आपटले.ईश्वर त्यांना सावरण्याचे बळ देवो ) pic.twitter.com/KSnfuawwFz
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) October 21, 2020
“मी भाजपच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा आज दिला. गेल्या 40 वर्षात मी भाजपचं काम केलं. भाजप जिथे पोहोचला नव्हता, तिथे आम्ही पोहोचवली. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी छळले, माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला लावला” असं एकनाथ खडसे भाजपच्या राजीनाम्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले. (Amol Mitkari reacts on Devendra Fadnavis after Eknath Khadse resigns)
काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही, देवेंद्र फडणवीसांनी छळले. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र फडणवीसांना गुन्हा दाखल करायला लावला याचा मनस्ताप झाला, असं खडसे म्हणाले.
गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकरांसारखे कितीतरी नेते होते, त्यांच्यासोबत आजतागातयत भाजपचं काम केलं. भाजपने मला अनेक मोठी पदं दिली, मी ती नाकारु शकत नाही. मी भाजपवर किंवा केंद्रातील नेत्यावर टीका केली नाही, असं खडसे म्हणाले.
माझ्यासोबत एकही आमदार, एकही खासदार नाही. रक्षाताईंनी भाजप सोडणार नाही असं सांगितलं आहे, त्यांचा निर्णय घेण्यासाठी त्या सक्षम आहेत, असं खडसे म्हणाले. भाजप सोडताना खंत आहे. मला पक्षातून ढकलून लावलं. महिलेला माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला सांगितला, फडणवीसांनी मनस्ताप दिला, असं खडसेंनी सांगितलं.
मला राष्ट्रवादीने कोणतंही आश्वासन दिलं नाही. मंत्रिपदाबाबत राष्ट्रवादीच सांगू शकेल. मला पदाची अपेक्षा नाही. माझ्या ताकदीने मी पदं मिळवली आहेत. सहकारातून मिळवलं आहे, असं खडसे म्हणाले.
संबंधित बातम्या
EXCLUSIVE | एकनाथ खडसेंचं ठरलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश!
एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले…
एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…!
(Amol Mitkari reacts on Devendra Fadnavis after Eknath Khadse resigns)