Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट! अटक होणार? कारण काय?

मोठी बातमी! अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता

नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट! अटक होणार? कारण काय?
नवनीत राणाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 21, 2022 | 8:34 AM

स्वप्निल उमप, TV9 मराठी, अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana News) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी (Fake Cast Certificate) नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपत्र वॉरंट काढण्यात आलं आहे. तसंच पोलिसांनाही (Mulund Police) कारवाई करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. शिवडी कोर्टाने याबाबचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे आता नवनीत राणा यांच्यावर काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

खासदार नवनीत राणा यांनी बोगस जात प्रमाणपत्राप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात दाद मागितली आहे. मात्र सत्र न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे आता शिवडी कोर्टाने महत्त्वपूर्ण आदेश दिल्यामुळे नवनीत राणांच्या अडचणीत वाढ झालीय. शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टाने पोलिसांनी अजामीनपात्र वॉरंट काढत कारवाई करण्याचे आदेश आदेश दिलेत.

7 नोव्हेंबर रोजी याप्रकरणाची पुढील कारवाई होणार आहे. तोपर्यंत नवनीत राणा यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. दरम्यान, आता मुलुंड पोलीस नवनीत राणांविरोधात अजामीनपात्र वॉरंटवर नेमकी काय कारवाई करतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.

नवनीत राणा यांनी आपल्या शपथपत्रामध्ये दिलेलं जात प्रमाणपत्र खोटं आहे, असा आरोप करण्यात आला आहे. याविरोधात शिवसेनेचे माजी खासदार आनंदरराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर हायकोर्टाने जून 2021मध्ये नवनीर राणा यांचं जातप्रमाणपत्र रद्द देखील केलं होतं. शिवाय दोन लाखांचा दंडही ठोठावलेला.

मुंबई हायकोर्टाच्या निकालानंतर नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली होती. दरम्यान, नवनीत राणा यांनी मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. त्यानंतर जून 2021मध्ये सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निर्णयावर स्थगिती दिलेली.

दरम्यान, आता नवनीत राणा यांच्या वडिलांविरोधात गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यांनी फसवणूक करुन जात प्रमाणपत्र मिळवलं असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बोगस दाखला दिल्याचा आरोप नवनीत राणांवर आहे. याप्रकरणी नवनीत राणांसह त्यांच्या वडिलांवरही मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे.
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार.
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय.
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट.
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद.
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र.
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?.
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका.
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी.
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय...
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय....