AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासदार नवनीत कौर राणा यांच्या कुटुंबातील सात जणांना कोरोना

रवी राणा यांच्या वडिलांसोबतच आई, बहीण, बहिणीचे पती, भाचा, पुतण्या अशा एकूण सात जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे

खासदार नवनीत कौर राणा यांच्या कुटुंबातील सात जणांना कोरोना
Follow us
| Updated on: Aug 03, 2020 | 9:14 AM

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा आणि बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या कुटुंबातील सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे. नवनीत राणा यांच्या सासऱ्यांपाठोपाठ आणखी सहा जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. (Amravati MP Navneet Rana MLA Ravi Rana Family members tested Corona Positive)

आमदार रवी राणा यांचे वडील, म्हणजेच नवनीत कौर राणा यांचे सासरे गंगाधर राणा यांचा कोरोना रिपोर्ट काल दुपारी (रविवार 2 ऑगस्ट) पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर राणा दाम्पत्य, त्यांची मुले आणि कुटुंबातील इतर सदस्य, कार्यकर्ते अशा जवळपास 50 ते 60 जणाची कोरोना चाचणी घेण्यात आली.

आमदार रवी राणा यांच्या वडिलांसोबतच आई, बहीण, बहिणीचे पती, भाचा, पुतण्या अशा एकूण सात जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आमदार रवी राणा यांच्या घराचा संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात आला आहे.

“अमरावती येथील आरोग्य यंत्रणा पार ढासळली आहे. कोव्हिड रुग्णांचे हाल होत आहेत. कोव्हिड तपासणी करणाऱ्या खाजगी, कंत्राटी व्यक्तींची पार्श्वभूमी तपासून पाहली पाहिजे” असा आरोप  खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी सॅनिटायझर, मास्क आणि धान्य वाटण्यासाठी एप्रिल महिन्यात दौरे केले होते. नवनीत कौर राणाही यामध्ये सहभागी होत्या. त्यावेळी (एप्रिल महिन्यात) रवी राणा यांना 103-104 या श्रेणीत ताप आला. त्यामुळे त्यांच्या शरीरभर असह्य वेदना जाणवू लागल्या होत्या. तेव्हा त्यांना खासगी रुग्णालयात अ‍ॅडमिट करण्यात आले होते, परंतु त्यांना कोरोनाची लागण झाली नव्हती.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

नवनीत कौर राणा या अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर अपक्ष निवडून गेल्या आहेत. शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांचा धुव्वा उडवत नवनीत कौर निवडून आल्या आहेत. तर त्यांचे यजमान आणि युवा स्वाभिमान पक्षाचे नेते रवी राणा हे बडनेरा मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदारपदी निवडून आले आहेत. त्यांनीही शिवसेना उमेदवाराचाच पराभव केला. शिवसेनेच्या संजय बंड यांच्या पत्नी प्रिती यांना रवी राणांनी पराभवाची धूळ चारली होती.

संबंधित बातमी :

खासदार नवनीत कौर राणा यांच्या सासऱ्यांना कोरोनाची लागण

(Amravati MP Navneet Rana MLA Ravi Rana Family members tested Corona Positive)

जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम.
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान.
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार.
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक.
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....