ARMC Election 2022, Ward 15 : काँग्रेस गड राखणार की गडगडणार?; वॉर्ड क्रमांक 15ची हवा काय?
ARMC Election 2022, Ward 15 : वॉर्डाची फेररचना झाल्यानंतर आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीत बेलपूर प्रभाग क्रमांक 15मध्येही आरक्षण पडलं. त्यात 15(अ) हा वॉर्ड अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव झाला आहे. तर 15(ब) सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. आणि 15(क) जनरल झाला आहे.
अमरावती: नागपूर, अकोलानंतर अमरावती महापालिका (amravati municipal corporation) ही विदर्भातील अत्यंत महत्त्वाची पालिका आहे. त्यामुळे या महापालिकेचीही सातत्याने चर्चा होत असते. आता दिवाळीच्या आसपास निवडणुका लागणार असल्याने पुन्हा एकदा अमरावती महापालिकेचं वातावरण तापू लागलं आहे. यंदा 12 प्रभाग अतिरिक्त प्रभाग वाढल्यानेही इच्छुकांची चुळबुळ सुरू झाली आहे. यंदाही वॉर्डांची फेररचना झाल्याने अनेकांचे वॉर्ड त्यात गेले आहेत. त्यामुळे अनेकांना आता ही संधी वाटू लागली आहे. ही संधी साधण्यासाठी इच्छुक आणि आजीमाजी नगरसेवकांनी (corporator) जोरदार सेटिंग सुरू केली आहे. मात्र, राजकीय पक्ष कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यातच आता ओबीसी आरक्षणाचा (obc reservation) मार्गही मोकळा झाला आहे. त्यामुळे नव्याने आरक्षण सोडत झाल्यास आपला मतदारसंघ तर त्यात जाणार नाही ना? अशी धाकधूक इच्छुकांच्या मनात निर्माण झाली आहे.
मागच्यावेळी काय घडले?
मागच्या निवडणुकीत म्हणजे 2017च्या निवडणुकीत 15(अ) मधून काँग्रेसचे सलिमबेग विजयी झाले होते. 15(ब) मधून काँग्रेसच्या हफिजाबी युसूफशाह विजयी झाल्या होत्या. 15(क)मधून हफिजाबी नूर खाँ विजयी झाल्या होत्या आणि 15(ड)मधून शेख जफर शेख जब्बार हे विजयी झाले होते. म्हणजे प्रभाग क्रमांक 15 च्या चारही वॉर्डातून काँग्रेसचे चारही नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेसचं या वॉर्डात वर्चस्व राहिलं होतं.
प्रभाग क्रमांक 15 अ
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
शिवसेना | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
आता तीन वॉर्डाचा एक प्रभाग
मागच्या निवडणुकीत चार वॉर्डाचा एक प्रभाग होता. आता तीन वॉर्डांचा एक प्रभाग असणार आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 15 मधून तीनच नगरसेवक निवडून येणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात उभं राहण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या वाढणार हे मात्र निश्चित.
आरक्षण बदलणार?
वॉर्डाची फेररचना झाल्यानंतर आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीत बेलपूर प्रभाग क्रमांक 15मध्येही आरक्षण पडलं. त्यात 15(अ) हा वॉर्ड अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव झाला आहे. तर 15(ब) सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. आणि 15(क) जनरल झाला आहे. मात्र, कोर्टाने आता ओबीसी आरक्षण लागू करण्याचे आदेश दिल्याने एससी, एसटीचे मतदारसंघ वगळता इतर मतदारसंघात आरक्षण पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रभाग क्रमांक 15 ब
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
शिवसेना | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
मतदार किती?
या प्रभागात एकूण 18018 मतदार आहेत. त्यात अनुसूचित मतदारांची संख्या 6824 आहे. तर अनुसूचित जमातीच्या मतदारांची संख्या 471 एवढी आहे. त्यामुळे अनुसूचित जातीचं वर्चस्व अधिक असल्याने या प्रभागातील उमेदवारांचं भवितव्य हे अनुसूचित जातीच्या मतदारांच्या हाती आहे.
कसा आहे मतदारसंघ?
या मतदारसंघात चिंचफैल, हमालपुरा, न्यू बेलपुरा हायस्कूल परिसर, बेलपुरा परिसर, स्विपर कॉलनी, दरोगा प्लॉट, दंदे प्लॉट, सबनीस प्लॉट आणि राजापेठ गावठाण आदी भाग येतात.
प्रभाग क्रमांक 15 क
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
शिवसेना | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |