अमृता फडणवीसांची नवाब मलिकांना कायदेशीर नोटीस, ‘जाहीरपणे माफी मागा, नाहीतर…’

भाजपच्या अन्य नेत्यांवरही मलिकांनी आरोपांची मालिका सुरु केलीय. अशावेळी मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत असलेला जयदीप राणाचा एक फोटो पोस्ट केला होता. हा जयदीप राणा ड्रग्स पेडलर असल्याचंही मलिक म्हणाले होते. त्यावरुन आता अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

अमृता फडणवीसांची नवाब मलिकांना कायदेशीर नोटीस, 'जाहीरपणे माफी मागा, नाहीतर...'
नवाब मलिक, अमृता फडणवीस
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 3:45 PM

मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरण आणि आर्यन खान प्रकरणात रान उठवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांवर आरोपांची मालिका सुरु केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादानेच मुंबईत ड्रग्सचा काळा धंदा सुरु झाल्याचा आरोप मलिकांनी केलाय. भाजपच्या अन्य नेत्यांवरही मलिकांनी आरोपांची मालिका सुरु केलीय. अशावेळी मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत असलेला जयदीप राणाचा एक फोटो पोस्ट केला होता. हा जयदीप राणा ड्रग्स पेडलर असल्याचंही मलिक म्हणाले होते. त्यावरुन आता अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. (Amrita Fadnavis issues legal notice to Nawab Malik, demand for Publicly apologize)

देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने राज्यात ड्रग्स उद्योग चालत असल्याचा आरोप मलिकांनी केला होता. हा आरोप करण्यापूर्वी मलिक यांनी एक फोटो ट्वीट केला होता. त्यात अमृता फडणवीस आणि जयदीप राणा पाहायला मिळत होते. जयदीप राणा हा ड्रग्स पेडलर आहे. अमृता फडणवीस यांनी मुंबईतील नद्यांच्या संवर्धनासंदर्भात गायलेल्या गाण्याचं फायनान्स जयदीप राणा याने केलं होतं, असा दावा मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला होता.

अमृता फडणवीसांचा मलिकांना थेट इशारा

मलिकांच्या या आरोपानंतर अमृता फडणवीस चांगल्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी मलिकांना एक कायदेशीर नोटीस पाठवली आहे. पुढील 48 तासांत मानहानीकारक, दिशाभूल करणारे ट्विट डिलीट करा आणि सार्वजनिकपणे माफी मागा. नाहीतर मानहानीच्या खटल्याला सामोरे जा, असा इशाराच अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलाय.

‘नवाब मलिक यांनी काही फोटोंसह बदनामीकारक, दिशाभूल करणारे, अपमानास्पद ट्विट केले आहेत. भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली फौजदारी कारवाईसह बदनामीची नोटीस देत आहे. मलिक यांनी बिनशर्त सार्वजनिक माफी मागून 48 तासांत ट्विट हटवावेत किंवा कारवाईला सामोरं जावं’, असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलंय. या ट्विटमध्ये त्यांनी नोटीसचे काही फोटोही शेअर केले आहेत.

अमृता फडणवीसांना मलिकांच्या मुलीचे प्रत्युत्तर

दुसरीकडे नवाब मलिक यांची ‘बिगडे नवाब’ अशा शब्दात उल्लेख करणाऱ्या अमृता फडणवीस यांना मलिक यांची कन्या निलोफर मलिक-खान यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सत्य तुमच्या बाजूने आहे तर घाबरता कशाला? असा सवालच निलोफर मलिक खान यांनी अमृता फडणवीस यांना केला आहे.

निलोफर मलिक खान यांनी ट्विट करून हा सवाल केला आहे. तुमच्याकडे लपवण्यासारखं काहीच नसेल तर तुम्हाला मलिक यांच्या पत्रकार परिषदांची चिंता वाटता कामा नये. सत्य जर तुमच्या बाजूने आहे तर भीती बाळगू नका. जर तुमचे काही वाईट हेतू असतील तर ते उघड केले जातील, असा टोला निलोफर यांनी लगावला आहे.

इतर बातम्या :

‘अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचे कौतुक करतात’, अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया होणार?; डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर उद्धव ठाकरे कुटुंबीयांशी बोलून घेणार निर्णय

Amrita Fadnavis issues legal notice to Nawab Malik, demand for Publicly apologize

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.