एका दिवसाचं मुख्यमंत्रीपद मिळालं तर काय कराल? अमृता फडणवीस यांच्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले….

"आमच्या शुभेच्छा आहेत की आपण नक्की मुख्यमंत्री बनावेत आणि पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करावा. पण परिस्थिती अशी आली की तुम्हाला मुख्यमंत्री बनावं लागलं पण ते फक्त एक दिवसाचं, त्या एक दिवसात तुम्ही काय कराल?", असा प्रश्न अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांना विचारला. त्यावर राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली.

एका दिवसाचं मुख्यमंत्रीपद मिळालं तर काय कराल? अमृता फडणवीस यांच्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले....
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 9:19 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. ‘लोकमत’च्या पुरस्कार सोहळ्यात ही मुलाखत आयोजित करण्यात आली. अतिशय दिलखुलास अशी ही मुलाखत पार पडली. या मुलाखतीत अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांना एक दिवसांचं मुख्यमंत्रीपद मिळालं तर काय कराल, कोणती गोष्टी आधी कराल? असा प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली.

अमृता फडणवीस : राज तुमच्या जीवनात राजकीय आशांपेक्षा सामाजिक आशय दिसून येतो. तुमच्या भाषण, वेगवेगळे आंदोलनात ते दिसून येतं. तुमची आंदोलनं यशस्वी झाली. आमच्या शुभेच्छा आहेत की आपण नक्की मुख्यमंत्री बनावेत आणि पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करावा. पण परिस्थिती अशी आली की तुम्हाला मुख्यमंत्री बनावं लागलं पण ते फक्त एक दिवसाचं, त्या एक दिवसात तुम्ही काय कराल? तुम्ही एकदा म्हणाला होता की, एकदा सत्ता हातात द्या, सुतासारखं सगळ्यांना करेन. काय कराल?

राज ठाकरे : एका दिवसात काय करु? एका दिवसात काय होतं?

हे सुद्धा वाचा

अमृता फडणवीस : तरीही?

राज ठाकरे : एका दिवसात काय होतं? तुम्ही पाच वर्षाचं मुख्यमंत्रीपद देत होता, आता एका दिवसावर कुठे आलात?

अमृता फडणवीस : नाही तुम्हाला सहा महिने दिले तर तुम्ही लगेच काय बदलाव आणाल?

राज ठाकरे : असं आता मला सहा महिने, एक दिवस, पाच दिवस असं सांगता येणार नाही. माझ्याकडे अनेक गोष्टी आहेत त्या सहज बदलू शकतो. कायदे आहेत. कायदा आहे पण ऑर्डर नाही. मला वाटतं कायदे आहेत. पण त्याची अंमलबजावणी होत नाही. मला असं वाटतं ऑर्डरची गरज आहे. त्या गोष्टी सुरळीत होऊ शकतात. माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर विश्वास आहे. तुम्ही त्यांच्या हातामध्ये 48 तास द्या. त्यांना सांगा, मला महाराष्ट्र साफ करुन द्या. सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात. पण त्यांना ऑर्डर नसतं. रिस्क कोण घेईल? पोलिसांनी एखादी भूमिका घेतल्यावर जेलमध्ये जावं लागत असेल तर ते जेलमध्ये का जातील आणि कुणासाठी जातील? बसलेलाच माणूस टेम्पररी आहे. त्यासाठी ते जेलमध्ये जातील.

अमृता फडणवीस : मला वाटतं पोलीस ऑफिसरलाच एक दिवसाचा मुख्यमंत्री बनवला पाहिजे?

राज ठाकरे : आपल्याकडे उत्तम पोलीस अधिकारी आहेत. महाराष्ट्र त्याबाबतीत भाग्यवान आहे. फक्त त्या लोकांना 48 तासांसाठी मोकळा हात द्या.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.