दिखाओ चप्पल, फेको पत्थर, ये तो शौक़ हैं पुराना आपका, अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा हल्ला

शिवसेना महिला आघाडीच्या या आंदोलनाचा व्हिडीओ अमृता फडणवीस यांनी स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

दिखाओ चप्पल, फेको पत्थर, ये तो शौक़ हैं पुराना आपका, अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा हल्ला
Follow us
| Updated on: Dec 24, 2019 | 5:12 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका करणाऱ्या माजी मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस (Amruta Fadnavis tweet on Uddhav thackeray) यांच्याविरोधात शिवसेनेच्या महिला आघाडीने आता मोर्चा उघडला आहे. शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी सोशल मीडियावर अमृता फडणवीसांना उत्तर दिल्यानंतर, आता शिवसेना महिला आघाडीने अमृता फडणवीसांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केलं. इतकंच नाही तर अमृता फडणवीस हाय हाय अशी घोषणाबाजीही सेना महिला आघाडीने दिली. (Amruta Fadnavis tweet on Uddhav thackeray)

शिवसेना महिला आघाडीच्या या आंदोलनाचा व्हिडीओ अमृता फडणवीस यांनी स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अमृता फडणवीस म्हणतात, लोकांच्या माथी मारुन तुम्ही नेतृत्व सिद्ध करु शकत नाही, तो एक हल्ला असतो, नेतृत्व नाही. दिखाओ चप्पल, फेको पत्थर, ये तो शौक़ हैं पुराना आपका, हम तो वो शक़्स हैं की धुप में भी निखर आएँगे !” असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं.

यापूर्वीही अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. “आडनाव लावल्याने कोणीही ठाकरे होत नाही. त्यासाठी सत्यवादी आणि तत्वनिष्ठ असावं लागतं”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या.

अमृता फडणवीसांना शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या उत्तर देतील, असं काल शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते. थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव घेत टीका केल्याने सर्वसामान्य शिवसैनिकांपासून नगरसेवकांनी  मिसेस फडणवीसांवर प्रतिहल्ला चढवला होता.

सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथदादा पेशवेंची बुद्धी भ्रष्ट केली, असं म्हणत शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना जोरदार टोला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ‘फक्त आडनाव ठाकरे असून चालत नाही’ अशी बोचरी टीका मिसेस फडणवीसांनी (Shivsena Corporator on Amruta Fadnavis) केली होती.

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?

देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील विधानावरुन ट्विटरवर टीका केली होती. ‘राहुल गांधी यांचं वक्तव्य निंदनीय आहे! वीर सावरकर आणि त्यांची महानता किंवा सत्कार्यांच्या जवळपासही राहुल गांधी पोहचत नाहीत. इतकंच नव्हे, तर त्यांनी स्वत:ला ‘गांधी’ समजण्याची चूकही करु नये! कोणीही गांधी आडनाव लावून ‘गांधी’होऊ शकत नाही!’ असं ट्वीट फडणवीसांनी केलं होतं.

देवेंद्र फडणवीसांचं ट्वीट कोट करुन अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. “खरं आहे देवेंद्र फडणवीसजी. त्याचप्रमाणे ठाकरे आडनाव लावल्याने कोणीही ठाकरे होत नाही. त्यासाठी सत्यवादी आणि तत्वनिष्ठ असावं लागतं. एखाद्याने स्वतःचे कुटुंब आणि सत्तेपेक्षा जनता आणि पक्षातील कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करण्याची गरज असते,” असं ट्वीट करत अमृता फडणवीसांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना टॅगही केलं होतं.

याआधीही अमृता फडणवीस यांनी आरे कारशेडसाठी वृक्षतोडीला दिलेल्या स्थगितीवरुन शिवसेनेला टोला लगावला होता. औरंगाबादमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी झाडं कापण्यात येणार आहेत, अशा आशयाची बातमी एका वृत्तपत्रात छापून आली होती. या बातमीचा फोटो अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधला होता. “शिवसेना ही ढोंगी आहे. आपल्या सोयीप्रमाणे ते झाडांच्या कत्तलीला विरोध करतात. तसेच शिवसेना कमिशनखोर आहे. त्यांचा ढोंगीपणाचा आजार लवकर बरा होवो,” असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं होतं.

संबंधित बातम्या  

ठाकरे आडनाव लावल्याने कोणी ठाकरे होत नाही, अमृता फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका 

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.