Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ट्रॅफिकमुळे तीन टक्के घटस्फोट होतात’, अमृता फडणवीसांचा दावा; सत्ताधाऱ्यांचं जोरदार प्रत्युत्तर, महिला वकिलांचं मत काय?

ट्रॅफिकमुळे तीन टक्के घटस्फोट होतात. कारण आपण कुटुंबाला वेळ देत नाही, असं मत व्यक्त करत अमृता फडणवीस यांनी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. आता शिवसेनेकडूनही अमृता फडणवीस यांना प्रत्युत्त देण्यात आलंय. तर अमृता फडणवीसांच्या वक्तव्यावर महिला वकिलांचं मत काय आहे? तेही जाणून घेऊया.

'ट्रॅफिकमुळे तीन टक्के घटस्फोट होतात', अमृता फडणवीसांचा दावा; सत्ताधाऱ्यांचं जोरदार प्रत्युत्तर, महिला वकिलांचं मत काय?
किशोरी पेडणेकर, अमृता फडणवीस
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 5:20 PM

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) आपली वक्तव्ये, ट्वीट आणि महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांवरील टीकेमुळे नेहमी चर्चेत असतात. राज्यातील विविध विषयांवर अमृता फडणवीस आपलं रोखठोक मत व्यक्त करत असतात. आताही अमृता फडणीस यांनी मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे आणि ट्राफिकबाबत (Mumbai Traffic) एक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची आता राज्यभरात चर्चा सुरु झालीय. मी रोज सामान्य स्त्री म्हणून घराबाहेर पडते. त्यावेळी मलाही ट्रॅफिक आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास होतो. रस्त्यावर ट्रॅफिक आहे, खड्डे आहेत. ट्रॅफिकमुळे तीन टक्के घटस्फोट होतात. कारण आपण कुटुंबाला वेळ देत नाही, असं मत व्यक्त करत अमृता फडणवीस यांनी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. आता शिवसेनेकडूनही अमृता फडणवीस यांना प्रत्युत्त देण्यात आलंय. तर अमृता फडणवीसांच्या वक्तव्यावर महिला वकिलांचं मत काय आहे? तेही जाणून घेऊया.

अमृता फडणवीसांचं नेमकं वक्तव्य काय?

मी फडणवीसांची बायको आहे हे तुम्ही विसरून जा. मी सामान्य नागरिक म्हणून बोलते. मी रोज सामान्य स्त्री सारखी घराबाहेर पडते. त्यावेळी मलाही ट्रॅफिक आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास होतो. रस्त्यावर ट्रॅफिक आहे, खड्डे आहेत. ट्रॅफिकमुळे तीन टक्के घटस्फोट होतात. कारण आपण कुटुंबाला वेळ देत नाही. मुंबईत अनेक इश्यू आहेत. मेट्रो, रस्ते, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष न देता सरकार खिसे भरू लागले तर त्यावर टीका होणारच. तुम्ही या मुद्द्यांवर लक्ष दिलं पाहिजे. ती मुंबईची गरज आहे, असं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलं होतं.

किशोरी पेडणेकरांचं प्रत्युत्तर

अमृता फडणवीस यांच्या दाव्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी खोचक टीका केलीय. अमृता फडणवीस यांचा तर्क हास्यास्पद आहे. त्या दरवेळी ऐकावं ते नवलंच अशाप्रकारचं बोलत असतात. आता तर त्यांनी जावईशोध लावला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर हसावं की रडावं असा प्रश्न मुंबईकरांना पडला असल्याची टीका किशोरी पेडणेकर यांनी केलीय.

अमृता फडणवीसांच्या दाव्यावर महिला वकिलांचं मत काय?

अमृता फडणवीस यांचं वक्तव्य हे खूपच हास्यास्पद आहे. घटस्फोटाची कारणं वेगवेगळी असू शकतात. कुटुंबातल्या अनेक गोष्टी त्याला कारणीभूत असतात. मात्र ट्रॅफिक आणि घटस्फोट यांचा संबंध जुळेल अशी कोणतीही केस आजतागायत कोर्टासमोर आलेली नाही असा आमचा अनुभव सांगतो. ट्रॅफिकमूळे कुटुंबाला वेळ देऊ न शकल्याने घटस्फोट होतात हे खूपच उथळ वाक्य आहे. एकाही दाम्पत्यानं कोर्टामध्ये अस म्हटल्याचं आम्हाला आठवत नाही. गेल्या बारा ते चौदा वर्षांपासून आम्ही फॅमिली कोर्ट मध्ये वकील म्हणून काम पाहतो. मात्र आजपर्यंतच्या आमच्या कामात असा अनुभव आलेला नाही. शिवाय कोर्टानेही तसं निरीक्षण नोंदवल्याच आमच्या माहितीत नाही, अशी प्रतिक्रिया महिला वकील सुजाता सकट, शैला साळुंखे आणि सुनिता शिंदे यांनी व्यक्त केलं आहे.

इतर बातम्या :

VIDEO: मी फडणवीसांची बायको आहे हे तुम्ही विसरून जा, सामान्य स्त्री म्हणून ट्विट करते: अमृता फडणवीस

Bandatatya Karadkar: स्त्रियांच्या पर्सनल आयुष्यावर बोलणं चुकीचं, ही मानसिकता बदलावी लागेल; अमृता फडणवीसांची बंडातात्यांवर टीका

VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक.
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं...
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं....
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं.
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका.
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन.
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल.
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल.
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?.
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक.
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?.