Anandrao Adsul : आनंदराव अडसूळ यांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?

त्यामुळे आनंदराव अडसूळ शिंदे गटात जाणार का? अशा राजकीय चर्चांणा उधाण आलंय. अडसूळ हे अमरावतीचे माजी खासदार आहेत.

Anandrao Adsul : आनंदराव अडसूळ यांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
आनंदराव अडसूळ यांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 10:18 PM

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अजूनही शिवसेनेतली त्यांच्याकडील नेत्यांची गळती रोखण्यात यश येईना, कारण रोज एक नवा नेते ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील होत आहे. आता आनंदराव अडसूळ (Ananad Adsul) यांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिलाय. त्यामुळे आनंदराव अडसूळ शिंदे गटात जाणार का? अशा राजकीय चर्चांणा उधाण आलंय. अडसूळ हे अमरावतीचे माजी खासदार आहेत. गेल्या निवडणुकीत नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याविरोधात त्यांना हार पत्करावी लागली होती. गेल्या अनेक दिवसात उद्धव ठाकरे यांना अनेक हादरे बसले आहेत. अनेक नेत्यांनी त्यांची साथ सोडत शिंदे गटात जाण्यात भलं मानलं आहे. तिच गळती अजूनही थांबत नाही. अजूनही नेते त्यांना सोडून जातच आहे. आगामी काही दिवसातही अनेक नेते साथ सोडण्याची शक्यता आहे. त्यातच आत अडसुळांच्या राजीनाम्याने अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

अडसूळ यांच्या मागे चौकशीचाही फेरा

आनंदराव अडसूळ शिवसेनेसाठी एक महत्वाचे नेते असून सध्या ते ईडीच्या चौकशीच्याही फेऱ्यात अडकले आहेत. गेल्या काही दिवसात त्यांची अनेकदा चौकशी झाली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने छापा टाकला होता. ईडीने त्याची चौकशी केली असून त्यांच्या घरातून अनेक कागदपत्रे, मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केले आहेत. अनेक नेत्यांना ईडी आणि सीबीआयची भिती दाखवून भाजप हे करवत आहे, असा आरोप वारंवार शिवसेना आणि महाविकास आघाडीतून होत असल्याचे पुन्हा हे वाढण्याची शक्यता आहे.

आणखी एक नेता शिंदे गटात जाणार?

गेल्या काही दिवसात अनेक नेते उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात दाखल होत आहे. अलिकडचेच उदाहरण म्हणजे सरकार स्थापन झाल्यानंतर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संतोष बांगर हे ठाकरे गटात होते तर दुसऱ्याच दिवशी ते शिंदे गटात दिसून आले. हाही प्रकार सर्वांनीच पाहिला आहे. तसेच दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत, असे अनेक नेते हे मातोश्रीवर दिसले. त्यानंतर ते थेट गुवाहाटीत दिसले. एकनाथ शिंदे यांची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तर उद्धव ठाकरे यांची ताकद दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात जर आणखी नेते साथ सोडून गेले तर येत्या निवडणुका या ठाकरेंसाठी सोप्या नसणार एवढं मात्र नक्की.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.