धगधगती मशाल घेऊन शिवसैनिक मातोश्रीवर, उद्धव ठाकरे म्हणाले, लक्षात घ्या…..! Video
अंधेरी विलेपार्ले येथील काही शिवसैनिक शिवाजी पार्कला पेटती मशाल घेऊन आले होते. ह्या शिवसैनिकांनी मातोश्रीत जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
दिनेश दुखंडे, मुंबईः निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला धगधगती मशाल (Mashal) हे पक्ष चिन्ह देण्यात आलंय. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गमावल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली. मात्र आता पुन्हा एकदा नव्या चिन्हासह लढण्यासाठी शिवसैनिक तयार आहेत, असे चित्र आज महाराष्ट्रात दिसून येत आहे. आज मुंबईतील शिवसैनिक (Shivsainik) मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले, यावेळी त्यांच्या हाती धगधगती मशाल होती.
अंधेरी विलेपार्ले येथील काही शिवसैनिक शिवाजी पार्कला पेटती मशाल घेऊन आले होते. ह्या शिवसैनिकांनी मातोश्रीत जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
पहा शिवसैनिकांचा उत्साह….
उद्धव ठाकरे यांनी ही मशाल घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिलं. या वेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. उद्धवसाहेब तुम आगे बढो.. हम तुम्हारे साथ है… अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी मातोश्रीवर विनायक राऊत, अरविंद सावंत आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
मातोश्रीवर आलेल्या शिवसैनिकांसमोर उद्धव ठाकरेंनी हात जोडले. आता अशी पेटती मशाल घेऊन आलात… पण ती हाताळण्यात कुठेही कचुराई करू नका. ती अन्याय आणि गद्दारी जाळण्यासाठी वापरायची आहे…
उद्धव ठाकरे म्हणाले, सांभालून….पाहा
मुंबईत शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरही आज नगरसेवकांच्या हस्ते धगधगत्या मशालीचं पूजन करण्यात आलं.
राज्यभरात विविध ठिकाणी शिवसेनेतर्फे धगधगती मशाल या शिवसेनेच्या नव्या चिन्हाचं प्रदर्शन करण्यात आलं.