पार्टी विथ डिफरन्स ! भाजपचा नेता म्हणतो, तुम्ही आम्हाला मत द्या, आम्ही तुम्हाला 50 रुपयात लीटरभर दारु देतो !

नवी दिल्लीः देशातील अनेक राज्यांमध्ये एकिकडे दारूविक्रीवर बंदी आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत तर दुसरीकडे आंध्रप्रदेशातील भाजप नेत्यानं विचित्रच वक्तव्य केलं आहे. भाजप नेते सोमू वीरराजू (Somu Virraju) यांनी भर सभेत जनतेला स्वस्त दारू उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. वि सोमू वीरराजू हे साधेसुधे नेते नसून ते आंध्रप्रदेश भाजपचे अध्यक्ष आहेत. आता या पदावरील नेत्याच्या अशा […]

पार्टी विथ डिफरन्स ! भाजपचा नेता म्हणतो, तुम्ही आम्हाला मत द्या, आम्ही तुम्हाला 50 रुपयात लीटरभर दारु देतो !
भाजप नेते सोमू वीरराजू
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 12:32 PM

नवी दिल्लीः देशातील अनेक राज्यांमध्ये एकिकडे दारूविक्रीवर बंदी आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत तर दुसरीकडे आंध्रप्रदेशातील भाजप नेत्यानं विचित्रच वक्तव्य केलं आहे. भाजप नेते सोमू वीरराजू (Somu Virraju) यांनी भर सभेत जनतेला स्वस्त दारू उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. वि सोमू वीरराजू हे साधेसुधे नेते नसून ते आंध्रप्रदेश भाजपचे अध्यक्ष आहेत. आता या पदावरील नेत्याच्या अशा प्रकारे वक्तव्यामुळे मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता एरवी पार्टी विथ डिफरन्स म्हणून मिरवणारा भारतीय जनता पक्ष याबाबत काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजप नेत्याचं नेमकं वक्तव्य काय?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष सोमू वीरराजू यांनी मंगळवारी विजयवाडा येथे एक सभा घेतली. या सभेत भाषण करताना ते म्हणाले, सध्या तर चांगल्या दर्जाच्या एक क्वार्टर दारूच्या बाटलीची किंमत 200 रुपयांपेक्षा जास्त आहे. राज्यात प्रत्येक व्यक्ती 12 हजार रुपये प्रति महिना दारूवर खर्च करते. सरकारकडून कोणत्या ना कोणत्या येजनेच्या स्वरुपात तो पैसा परत केला जातो. राज्यातील समजा 1 कोटी लोक दारू सेवन करत असतील तर 2024 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला एक कोटी मते द्या. आम्ही फक्त 70 रुपयांत एक लीटर दारू उपलब्ध करून देऊ. यातूनही आणखी महसूल वाचला तर आम्ही फक्त 50 रुपयात दारू उपलब्ध करून देऊ…” सोमू वीरराजू यांनी या सभेत सध्याचे आंध्र प्रदेश सरकार जनतेला महागात दारू विक्री करत असल्याचा आरोप केला. मात्र भाजप स्वस्त दारू विकेल, या आश्वासनानंतर आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

इतर बातम्या-

Bhagat Singh Koshyari’s letter to CM Uddhav Thackeray: तुमचं पत्रं अपमान आणि बदनामी करणारं, मुख्यमंत्र्यांच्या पत्राला राज्यपालांचं कडक शब्दात उत्तर, वाचा संपूर्ण पत्र जशास तसं

समलैंगिक, अलैंगिक संबंध कोण सिद्ध करणार? जनावरे सर्टिफिकेट देणार काय?; सुधीर मुनगंटीवारांचा पारा चढला

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.