Rajyasabha Election : अनिल बोंडे आणि पियुष गोयल यांना भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारी, तिसऱ्या उमेदवाराबाबत अद्यापही संभ्रम

केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांना राज्यसभेसाठी संधी देण्यात आली आहे. पियुष गोयल यांना संधी मिळणार हे अपेक्षितच होते, मात्र बोंडे यांचे नाव अनपेक्षित मानले जात आहे. तिसरा उमेदवार भाजपा देणार का, याबाबतचा संभ्रम अद्यापही कायम आहे.

Rajyasabha Election : अनिल बोंडे आणि पियुष गोयल यांना भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारी, तिसऱ्या उमेदवाराबाबत अद्यापही संभ्रम
अनिल बोंडे आणि पियुष गोयल यांना भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 7:44 PM

मुंबईराज्यसभा निवडणुकांची (Rajyasabha Election) सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरु आहे. शिवसेनेने आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर आता भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांना राज्यसभेसाठी संधी देण्यात आली आहे. पियुष गोयल यांना संधी मिळणार हे अपेक्षितच होते, मात्र बोंडे यांचे नाव अनपेक्षित मानले जात आहे. तिसरा उमेदवार भाजपा देणार का, याबाबतचा संभ्रम अद्यापही कायम आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजप कोण उमेदवार देणार? याबाबत सस्पेन्स होता. मात्र अखेर आज हा सस्पेन्स संपला आहे. मात्र यातल्या एका उमेदवारीने सर्वांनाच सरप्राईज दिलं आहे म्हणावं लागेल. आधी फडणवीसांना या उमेदवारीबाबत विचारले असता फडणवीस हे निर्णय वरिष्ठ पातळीवर होतात, असे म्हणत हा सस्पेन्स आणखी वाढवत होते.

भाजपची राज्यसबेची यादी

अनिल बोंडे यांची उमेदवारी अनपेक्षित

राज्यसभेच्या तीन जागा गेल्या वेळी भाजपाकडे होत्या. त्यात पियुष गोयल, विकास महात्मे आणि विनय सहस्रबुद्धे यांना संधी मिळाली होती. यातील पियुष गोयल हे केंद्रीय मंत्री असल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानण्यात येत होती. मात्र इतर दोन जागांसाठी विनोद तावडे, विजया रहाटकर यांच्या नावांची चर्चा होती. मात्र अनपेक्षितपणे विदर्भातील माजी कृषीमंत्री असलेल्या अनिल बोंडे यांना उमेदवारी मिळाली आहे.

हे सुद्धा वाचा

तिसऱ्या जागेबाबतचा संभ्रम कायम

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजपाचे यावेळी दोनच उमेदवार निवडून येईल एवढे संख्याबळ पक्षाकडे आहे. एका जागेसाठी ४२ मतांची गरज आहे. भाजपाचे संख्याबळ १०५ आहे, तिसऱ्या उमेदवारासाठी असलेली आवश्यक मते त्यांच्याकडे नाहीत. अपक्ष आणि भआजपाची इतर मते मिळून भाजपाकडे २७ मते आहेत. तर याच जागेसाठी महाविकास आघाडीकडे त्यांचे प्रत्येकी एकेक उमेदवार वगळता, ४१ मते शिल्लक राहणार आहेत. ही जागा शिवसेना लढवणार असल्याचे संजय राऊत यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. शिवसेनेसाठी यासाठी राऊत आणि संजय पवार असे उमेदवारही जाहीर केले आहेत. भाजपाने अद्यापही तिसऱ्या जागेचा निर्णय जाहीर केलेला नाही.

काँग्रेसच्या गोटातला सस्पेन्स कायम

राज्यसभेसाठी शिवसेनेकडून सर्वात आधी संजय राऊत आणि संजय पवार यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीनेही पुन्हा प्रफुल्ल पटेल यांना संधी दिली आहे. तर भाजपकडून आता पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांचं नाव निश्चित झालं आहे. मात्र काँग्रेसच्या गोटातला सस्पेन्स अजूनही संपला नाही. काँग्रेसने अद्याप कुणाचेही नाव जाहीर केले नाही. त्यामुळे आता काँग्रेस ही जागा कुणाला देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.