शरद पवारांच्या विदर्भ दौऱ्यावर अनिल बोंडेंची टीका, तर अंकुश काकडेंचं बोंडेंना जोरदार प्रत्युत्तर

शरद पवार यांनी विदर्भ आणि अमरावतीच्या दौऱ्यावर येऊ नये, असं म्हणत भाजप नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी पवारांच्या दौऱ्याला विरोध केलाय. तर विदर्भ काय अनिल बोंडे यांच्या बापाचा आहे का? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडेंनी केलाय.

शरद पवारांच्या विदर्भ दौऱ्यावर अनिल बोंडेंची टीका, तर अंकुश काकडेंचं बोंडेंना जोरदार प्रत्युत्तर
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 6:09 PM

मुंबई : भाजपच्या गडात सुरुंग लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. अशावेळी पवारांच्या विदर्भ दौऱ्यावरुन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमने-सामने आले आहेत. शरद पवार यांनी विदर्भ आणि अमरावतीच्या दौऱ्यावर येऊ नये, असं म्हणत भाजप नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी पवारांच्या दौऱ्याला विरोध केलाय. तर विदर्भ काय अनिल बोंडे यांच्या बापाचा आहे का? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडेंनी केलाय. (Anil Bonde criticizes Sharad Pawar’s Vidarbha tour, while Ankush Kakade responds to Bonde)

अनिल बोंडेंची पवारांवर टीका

शरद पवार यांनी अमरावती आणि विदर्भाच्या दौऱ्यावर येऊ नये. पवार कोणत्या तोंडाने विदर्भ दौरा करत आहेत माहिती नाही. त्यांनी अमरावतीमध्ये येऊच नये. त्यांना संतप्त शेतकरी आणि नागरिक जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत. विदर्भात फिरताना त्यांनी थोडी सावधगिरी बाळगावी, अशा शब्दात अनिल बोंडे यांना पवारांच्या दौऱ्यावर टीका केलीय.

अंकुश काकडेंचं बोंडेंना प्रत्युत्तर

अनिल बोंडे यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. विदर्भ काय तुमच्या बापाचा आहे का? शरद पवार महाराष्ट्रात कुठेही फिरू शकतात. भाजपला राज्यातील वातावरण बिघडवायचं आहे. एका माजी मंत्र्याला असं वक्तव्य शोभा देत नाही, अशा शब्दात काकडेंनी बोंडे यांना उत्तर दिलं आहे.

शरद पवार यांचे चार दिवस ‘मिशन विदर्भ’

शरद पवार आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. ते चार दिवसात नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांचा दौरा करतील. यादरम्यान ते कार्यकर्त्यांच्या भेटी आणि सभा घेणार आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा विदर्भ दौरा महत्वाचा मानला जात आहे. विदर्भ हा भाजपचा गड मानला जातो. आता त्याच गडात राष्ट्रवादी आपली पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे.

शरद पवार हे आज दुपारी एक वाजताच्या सुमारास नागपुरात पोहोचतील. त्यानंतर ते व्यापाऱ्यांसोबत बैठक, पत्रकार परिषद आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतील. शरद पवार यांच्या दौऱ्यामुळं विदर्भातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळणार आहे. तसेच, याने पक्षालाही बळ मिळणार असल्याचं बोललं जात आहे.

कसा असेल शरद पवारांचा चार दिवसांचा विदर्भ दौरा –

17 नोव्हेंबर –

दुपारी 1 वाजता – नागपूर विमानतळावर आगमन

दुपारी 3 ते 4 वाजता – हॉटेल सेंटर पॉईंट येथे पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा

दुपारी 4 वाजता – शरद पवार पत्रकार परिषद घेतील

संध्याकाळी 5 वाजता – राष्ट्रवादीचा मेळावा

18 नोव्हेंबर –

सकाळी 8.30 वाजता – शरद पवार नागपूरहून निघतील

सकाळी 11.15 वाजता – गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज वडसा येथे पोहोचतील

सकाळी 11.30 वाजता – राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतील

दुपारी 2 वाजता – ते देसाईगंज वडसा येथून गडचिरोलीत येतील

दुपारी 3 वाजता – कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील

दुपारी 4 वाजता – पत्रकार परिषद घेतील

संध्याकाळी 5.30 वाजता – चंद्रपूर जिल्ह्यातील मूळ येथे पोहोचतील आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतील

रात्री 8 वाजता – ते चंद्रपुरात दाखल होतील आणि तिथेच मुक्काम करतील

19 नोव्हेंबर –

सकाळी 9.30 वाजता – शरद पवार चंद्रपुरातील डॉक्टर, वकील आणि व्यावसायिकांशी चर्चा करतील

सकाळी 11 वाजता – चंद्रपूर शहरातील कार्यकर्त्यांची बैठक घेतील

सकाळी 12 वाजता – चंद्रपुरातील ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची बैठक घेतील

दुपारी 1 वाजता – जनता हाय स्कूल येथे पत्रकार परिषद घेतील

सायंकाळी 5.30 वाजता – यवतमाळ येथे पोहोचतील

सायंकाळी 5.30 वाजता – कार्यकर्त्यांची बैठक घेतील

20 नोव्हेंबर –

सकाळी 9.30 वाजता – वसंत घुईखेडकर यांची भेट घेणार

सकाळी 10 वाजता – पत्रकार परिषद घेणार

सकाळी 10.30 वाजता – कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार

दुपारी 3.15 वाजता – वर्धा येथे पोहोचतील

दुपारी 3.30 वाजता – वर्धेत कार्यकर्त्यांचा मेळावा घेतील

संध्याकाळी 5.30 वाजता – कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी

संध्याकाळी 6 वाजता – वर्धेहून निघतील

संध्याकाळी 7.30 वाजता – नागपूर विमानतळावर दाखल होतील

रात्री 8 वाजता – नागपूरहून मुंबईच्या दिशेने निघतील

इतर बातम्या :

शरद पवारांचा पुन्हा एकदा फडणवीसांना टोला, तर गडकरीचं कौतुक; हिंसाचाराच्या घटनेवरही भाष्य

पेट्रोल-डिझेलवर सेस वाढवून केंद्र सरकारने राज्याचे 30 हजार कोटी हडपले, नाना पटोलेंचा घणाघात

Anil Bonde criticizes Sharad Pawar’s Vidarbha tour, while Ankush Kakade responds to Bonde

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.