Anil Deshmukh : अनिल देशमुखांनंतर आता पत्नी आरती देशमुखांनाही ईडीचं समन्स, चौकशीला हजर राहण्याचे आदेश

आरती देशमुख यांना आजचं समन्स दिलं आहे. त्या 66 वर्षांच्या आहेत. त्यांना कोरोना झाला आहे. त्यांना अनेक आजार आहेत. त्या गृहिणी आहे. त्यांचा या व्यवहाराशी काही संबंध नाही, असा दावाही घुमरे यांनी पत्रकार परिषदेत केलाय.

Anil Deshmukh : अनिल देशमुखांनंतर आता पत्नी आरती देशमुखांनाही ईडीचं समन्स, चौकशीला हजर राहण्याचे आदेश
अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी आरती देशमुखांनाही ईडीकडून समन्स देण्यात आले होते
Follow us
| Updated on: Jul 14, 2021 | 6:38 PM

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर मुलगा ऋषिकेश आणि आता पत्नी आरती यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. आरती देशमुख यांना उद्या सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनिल देशमुख यांचे वकील कमलेश घुमरे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिलीय. आम्ही गुन्हा रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. ईडीकडून अनेक बातम्या येत होत्या. त्यात अनेक विसंगतीही होत्या. नक्की सत्यता काय आहे? हे सांगण्यासाठीच आपण आज पत्रकार परिषद घेत असल्याचं घुमरे म्हणाले. (ED summons Anil Deshmukh’s wife Aarti Deshmukh)

आतापर्यंत अनिल देशमुख, आरती देशमुख, ऋषिकेश देशमुख या तीन जणांना ईडीने समन्स दिलं आहे. आरती देशमुख यांना आजचं समन्स दिलं आहे. त्या 66 वर्षांच्या आहेत. त्यांना कोरोना झाला आहे. त्यांना अनेक आजार आहेत. त्या गृहिणी आहे. त्यांचा या व्यवहाराशी काही संबंध नाही, असा दावाही घुमरे यांनी पत्रकार परिषदेत केलाय.

‘वाझे आणि देशमुखांची फक्त एकदाच भेट’

सचिन वाझे आणि अनिल देशमुख प्रकरणात न्यायमूर्ती चांदिवाल यांच्या कमिशनसमोर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्या ठिकाणी सचिन वाझे याने प्रतिज्ञापत्र साद केलंय. त्यात तो काही बोलत नाही. त्यात तो 4 कोटी 70 लाख रुपयांबाबत काही बोलत नाही. अनिल देशमुख यांना भेटल्याचंही वाझे सांगत नाही. आपण फक्त जानेवारीमध्ये एकदाच भेटल्याचं सांगत वाझे सांगत असल्याचंही घुमरे म्हणाले. ईडी आणि सीबीआय जेव्हा जबाब घेतात तेव्हा त्यांचा माणूस तिथे असते. मात्र, आयोगासमोर मोकळ्या वातावरणात प्रतिज्ञापत्र दिलं आहे, असंही घुमरे यांनी म्हटलंय.

‘100 कोटी रुपयांचा आरोप खोटा, बारची संख्याही विसंगत’

आयोगासमोर आलेल्या प्रतिज्ञापत्रात सचिन वाझे याने पैसे दिले असं सांगत नाही. सचिन वाझे यांनी दिलेला जबाब हा दबावाखालीच असावा. अधिकाऱ्यांसमोर दिलेला जबाब दबावाखालीच असतो. CRPC मध्ये पोलिसांसमोर दिलेल्या जबाब स्वीकारला जात नाही. 100 कोटी रुपयांचा आरोप खोटा आहे. बारची संख्याही विसंगत आहे, असा दावाही घुमरे यांनी केलाय.

आतापर्यंत अनिल देशमुख, आरती देशमुख, ऋषिकेश देशमुख या तीन जणांना ईडीने समन्स दिलं आहे. आरदी देशमुख यांना आजचं समन्स दिलं होतं. त्या 66 वर्षांच्या आहेत. त्यांना कोरोना झाला आहे. त्यांना अनेक आजार आहेत. त्या गृहिणी आहे. त्यांचा व्यवहाराशी काही संबंध नाही, असंही घुमरे यांनी म्हटलंय. तसंच ईडीने पेपर हे पब्लिक डॉक्युमेंट व्हायला हवे, अशी मागणीही देशमुखांच्या वकिलांनी पत्रकार परिषदेत केलीय.

संबंधित बातम्या :

सचिन वाझेने नाव फोडलेले ‘नंबर वन’ साहेब अनिल देशमुख नव्हे, वकिलाचा दावा, दुसरंच नाव सांगितलं!

सचिन वाझेचा जबाब दबावाखाली, अनिल देशमुखांच्या वकिलांचा आरोप; वाझे देशमुखांना फक्त एकदाच भेटल्याचा दावा

ED summons Anil Deshmukh’s wife Aarti Deshmukh

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.