मुंबई : जवळपास 100 कोटी वसुली प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय (CBI) करत आहे. सदर प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh), सचिन वाझे, कुंदन शिंदे, संजीव पालांडे या चारही आरोपींना सीबीआयने ताब्यात घेऊन नंतर विशेष सीबीआय कोर्टातुन सीबीआय कोठडी (custody) घेतली होती. आज सीबीआय कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा चारही आरोपीना न्यायालया समोर हजर करण्यात आला. त्यावेळी त्यांच्या पुन्हा पाच दिवसाची कोठडी वाढवून देण्याची मागणी सीबीआयच्या वकिलांकडून करण्यात आली. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने आज पुन्हा या चारही आरोपींना 16 एप्रिल पर्यंत सीबीआय कोठडी पाठवण्याचा निर्णय दिला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा वय 73 वर्ष आहे. त्यांना युरिन कंट्रोल करणं शक्य होत नाही त्याचबरोबर . काही इतर आजारांशी ते झुंजत आहेत. मागील बराच काळ आरोपी हे कोठडीत आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यात सचिन वाझे यांचा जवाब नोंदवला गेला. इतर आरोपी सोबत समोरा समोर चौकशी झाली मग परत कोठडी मागून अजून कोणते जबाब तपास यंत्रणाला नोंदवायचे आहेत असा सवाल वरिष्ठ वकील विक्रम चौधरी यांनी केला.
त्याच बरोबर संजीव पलांडे यांचे वकील शेखर जगताप यांनी युक्तिवाद करताना संजीव पलांडे यांना कसं टॉर्चर केलं जातंय हे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. पलांडे यांच्यासोबत वाईट कृत्य होत आहे. पाच पाच तास एकाच ठिकाणी भिंतीकडे बघत बसायला लावणं, अस्वच्छ वातावरण मध्ये बसवणं हे किती योग्य आहे ? त्यांना टॉर्चर केलं जात आहे. एका खोलीत तासन तास चौकशी सुरू आहे आणि वकीलांना बाहेर बसवलं जातंय असा आरोप करून सीबीआयकडे पुन्हा कस्टडी देऊ नये अशी मागणी शेखर जगतात यांनी केली. ऍड. रत्नदीप सिंग यांनी सीबीआयच्या युक्तीवाद करताना गुन्ह्याची गंभीरता पाहता फक्त एक ते दोन वेळा कस्टडी घेऊन या प्रकरणात सत्य समोर आणता 33 येणार नाही. सध्या तपास करत असताना वारंवार आरोपी ब्रेक घेतात. त्यामुळे चौकशीत व्यत्यय येतो. म्हणून आरोपींची आणखी कस्टडीची गरज आहे असं त्यांनी सांगितले. यावेळी आरोपींच्या वकीलांनी कोठडीत दुर्व्यव्हार केला असल्याचा दावा केला असता सीबीआयचे वकिल रत्नदीप सिंग यांनी असे काही झाले नाही. तसेच असे काही घडल्याचे पुरावे असल्यास कोर्टात रीतसर त्यासंदर्भात तक्रार अर्ज द्यावा असे त्यांनी सांगितले.
अनिल देशमुख, संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या तीन आरोपींच्यावतीनं कस्टडी वाढवून देण्याला विरोध केलाय … मात्र सचिन वाझे यांच्या वकिलांनी आरोपींची कस्टडी वाढवून देण्याचं समर्थम केलंय … हे सारं प्रकरण माझ्या समोर घडलंय .. मी एक पोलीस अधिकारी राहीलोय, त्यामुळे कस्टडी किती महत्त्वाची असते याची आपल्याला कल्पना आहे .. मला जे काही सांगायचं होतं ते मी सांगितलंय … सचिन वाझे च्या वतीने एड . रौनक नाईक यांचा युक्तिवाद केला .. दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर अनिल देशमुख यांच्यासह इतर आरोपींना 16 एप्रिल पर्यंत पुन्हा सीबीआय कोठडी पाठवण्याचा निर्णय सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने दिला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या लेटर बॉम्बमुळे अडचणीत सापडलेल्या देशमुखांची ईडी मनी लाँड्रिंग आरोपांतर्गत चौकशी सुरू केली. 21 एप्रिल रोजी, देशमुखांविरोधात गुन्हा नोंदवून 12 तासांच्या चौकशीनंतर 1 नोव्हेंबर रोजी ईडीनं देशमुखांना अटक केली. तेव्हापासून देशमुख आर्थर रोड कारागृहात आहेत. 29 डिसेंबर 2021 रोजी ईडीनं देशमुखांसह अन्य आरोपींविरोधात पुरवणी आरोपपत्र आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्या (पीएमएलए)अंतर्गत विशेष न्यायालयात दाखल केलेलं आहे. सुमारे सात हजार पानांचे आरोपपत्र असून या प्रकरणातील हे दुसरे आरोपपत्र होतं. मुंबई सत्र न्यायालयानं अनिल देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर देशमुखांनी हायकोर्टात जामीनासाठी याचिका दाखल केलीय ..त्यावर हायकोर्टाने अनिल देशमुख यांना झालेल्या आजाराची पूर्ण माहिती शपथपत्रच्या स्वरूपात मागितली आहे ..लवकरच त्यावर सुनावणी होणार आहे .
इतर बातम्या
Breaking : बडतर्फ एसटी कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
काय सांगता? पेट्रोल-डिझेल खरंच स्वस्त होणार? उत्पादन शुल्क कपातीबाबत केंद्राचा विचार सुरु
Special Report | शिवसेना गृहखात्यावर आणि कॉंग्रेस मुख्यमंत्र्यांवर नाराज? – Tv9