सचिन वाझेने नाव फोडलेले ‘नंबर वन’ साहेब अनिल देशमुख नव्हे, वकिलाचा दावा, दुसरंच नाव सांगितलं!
अनिल देशमुख हे परमबीर सिंग यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार होते. मात्र ते राहून गेलं. आधी त्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आम्ही पुढे आलो, असंही घुमरे यांनी म्हटलंय.
मुंबई : मुंबई पोलिस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे याने सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडे मोठे खुलासे केल्याचं सांगण्यात येत आहे. अशावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वकील अॅड. कमलेश घुमरे यांनी पत्रकार परिषद घेत सचिन वाझे प्रकरणात काही आरोप केले आहेत. त्यात सचिन वाझे यांनी नाव फोडलेले ‘नंबर वन’ साहेब अनिल देशमुख नाही, तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग असल्याचा आरोप घुमरे यांनी केलाय. अनिल देशमुख हे परमबीर सिंग यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार होते. मात्र ते राहून गेलं. आधी त्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आम्ही पुढे आलो, असंही घुमरे यांनी म्हटलंय. (‘Number One’ mentioned by Sachin Waze in ransom recovery case is not Anil Deshmukh but Parambir Singh)
काय आहे ‘नंबर वन’ प्रकरण?
वसुलीचे पैसे सचिन वाझे यांना देण्यात आल्याचं बार मालकांनी जबाब दिला आहे. बार मालकांकडून पैसे घेताना हे पैसे नंबर एक यांना द्यायचे आहेत, असं सचिन वाझे सांगायचा. नंबर वन म्हणजे नक्की कोण याचा खुलासा ईडीच्या अधिकाऱ्यांना होत नव्हता. त्याचाही खुलासा सचिन वाझे याच्या जबाबात झाला आहे. नंबर वन म्हणजे अनिल देशमुख हेच असल्याचं सचिन वाझेने आपल्या जबाबात सांगितल्यांची माहिती ईडी सूत्रांनी दिली आहे.
100 कोटी पैकी 4 कोटी 70 लाख रुपयांच्या रोख रखमेचा ईडीच्या तपासात खुलासा झाला आहे. बाकी रक्कम कुठून गोळा झाली, कोणी गोळा केली, ती रक्कम कोणाला देण्यात आली, याचा तपास ईडीचे अधिकारी करत आहेत.
‘न्यायमूर्ती चांदिवाल यांच्या कमिशनसमोर अनेक गोष्टी समोर’
सचिन वाझे आणि अनिल देशमुख प्रकरणात न्यायमूर्ती चांदिवाल यांच्या कमिशनसमोर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्या ठिकाणी सचिन वाझे याने प्रतिज्ञापत्र सादर केलंय. त्यात तो काही बोलत नाही. त्यात तो 4 कोटी 70 लाख रुपयांबाबत काही बोलत नाही. अनिल देशमुख यांना भेटल्याचंही वाझे सांगत नाही. आपण फक्त जानेवारीमध्ये एकदाच भेटल्याचं सांगत वाझे सांगत असल्याचंही घुमरे म्हणाले. ईडी आणि सीबीआय जेव्हा जबाब घेतात तेव्हा त्यांचा माणूस तिथे असते. मात्र, आयोगासमोर मोकळ्या वातावरणात प्रतिज्ञापत्र दिलं आहे, असंही घुमरे म्हणाले.
‘100 कोटी रुपयांचा आरोप खोटा, बारची संख्याही विसंगत’
आयोगासमोर आलेल्या प्रतिज्ञापत्रात सचिन वाझे याने पैसे दिले असं सांगत नाही. सचिन वाझे यांनी दिलेला जबाब हा दबावाखालीच असावा. अधिकाऱ्यांसमोर दिलेला जबाब दबावाखालीच असतो. CRPC मध्ये पोलिसांसमोर दिलेल्या जबाब स्वीकारला जात नाही. 100 कोटी रुपयांचा आरोप खोटा आहे. बारची संख्याही विसंगत आहे, असा दावाही घुमरे यांनी केलाय.
संबंधित बातम्या :
अनिल देशमुखांच्या खासगी सहाय्यकांचा ईडी मुक्काम वाढला, 20 जुलैपर्यंत कोठडीत वाढ
‘Number One’ mentioned by Sachin Waze in ransom recovery case is not Anil Deshmukh but Parambir Singh