Anil Deshmukh : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत, आता खरं-खोटं बाहेर येईल- फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलंय. आता योग्य तपास होऊन या प्रकरणातील खरंखोटं बाहेर येईल, असं फडणवीस यांनी म्हटलंय.

Anil Deshmukh : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत, आता खरं-खोटं बाहेर येईल- फडणवीस
अनिल देशमुखांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, देवेंद्र फडणवीसांकडून निर्णयाचं स्वागत
Follow us
| Updated on: Apr 08, 2021 | 6:59 PM

नागपूर :  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाबाबत दाखल याचिकेनंतर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यावर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलंय. आता योग्य तपास होऊन या प्रकरणातील खरंखोटं बाहेर येईल, असं फडणवीस यांनी म्हटलंय. त्याचबरोबर लसीच्या तुटवड्यावरुन महाविकास आघाडीतील नेत्यांनाही फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. (Devendra Fadnavis welcomes Supreme Court decision in Anil Deshmukh case)

‘आता खरं-खोटं बाहेर येईल’

उच्च न्यायालयाने अतिशय स्पिकिंग ऑर्डर दिली होती. ज्याप्रकारे हे प्रकरण आहे त्यानुसार सीबीआयने चौकशी करावं, असं उच्च न्यायालयाने कारणासह सांगितलं होतं. तरीही राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा प्रयत्न केला. स्वत: अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाबाबत जी टिप्पणी केली आहे ती मला अतिशय महत्त्वाची वाटते. महाविकास आघाडीचे नेते याबाबत जे बोलत होते त्यांना उत्तर देणारी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केलीय. आता योग्यप्रकारे चौकशी होईल. त्यातून काय खरं-खोटं ते बाहेर येईल. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचं आम्ही स्वागत करतो”, असं फडणवीस म्हणाले.

लसीवरुन राज्य सरकारवरच निशाणा

महाराष्ट्रात कोरोना लसीवरुन राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. दुपारी मी स्वत: केंद्रीय मंत्र्यांशी बोललो. तीनच राज्यांना एक कोटी पेक्षा जास्त लसी दिल्या आहेत. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानला एक कोटी लसी देण्यात आल्यात. याउलट महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशची लोकसंख्या जास्त आहे. तरीही तिथे कमी लस दिल्या गेल्या. खरंतर महाराष्ट्रातील परिस्थितीपासून लक्ष दूर करण्यासाठी प्रयत्न केला जातोय की काय अशी शंका निर्माण झालीय. राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हीर इंजेक्शन नाही. ही जबाबदारी तर राज्य सरकारची आहे. पण या विषयावर कुणीच बोलत नाही. हे आधी उपलब्ध करा. मग राजकारण करा”, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.

संबंधित बातम्या :

‘आमच्या पुणेकर जावडेकरांना हे शोभा देत नाही’, संजय राऊतांचं प्रत्युत्तर, संभाजी भिडेंनाही टोला

Corona Vaccine : लसीकरण केंद्र जाणिवपूर्वक बंद करुन चुकीच्या बातम्या पसरवण्याचं कारण काय? फडणवीसांचा सवाल

Devendra Fadnavis welcomes Supreme Court decision in Anil Deshmukh case

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.