ये क्या हुआ? कैसे हुआ? कब हुआ? क्यों हुआ?, विरोधकांच्या गर्विष्ठ माना जनतेने वाकवल्या; अनिल देशमुखांची खोचक टीका

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीची सरशी झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुखांनी एका हिंदी सिनेमाच्या गाण्याच्या ओळी शेअर करत भाजपवर जोरदार टीका केली आहे. (anil deshmukh slams bjp over graduate constituency election result)

ये क्या हुआ? कैसे हुआ? कब हुआ? क्यों हुआ?, विरोधकांच्या गर्विष्ठ माना जनतेने वाकवल्या; अनिल देशमुखांची खोचक टीका
Follow us
| Updated on: Dec 04, 2020 | 12:01 PM

मुंबई: विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीची सरशी झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुखांनी एका हिंदी सिनेमाच्या गाण्याच्या ओळी शेअर करत भाजपवर जोरदार टीका केली आहे. ये क्या हुआ? कैसे हुआ? कब हुआ? क्यों हुआ?… ये ना पुछो, असं म्हणत विरोधकांच्या गर्विष्ठ माना जनतेने वाकवल्या, अशी खोचक टीका अनिल देशमुख यांनी केली आहे. (anil deshmukh slams bjp over graduate constituency election result)

अनिल देशमुख यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. ये क्या हुआ? कैसे हुआ? कब हुआ? क्यों हुआ?…ये ना पुछो, विरोधकांच्या गर्विष्ठ माना जनतेने वाकवल्या. महाविकासआघाडीला महाराष्ट्रातील जनतेने जोरदार कौल दिलाय. आतातरी विरोधकांनी महाराष्ट्र घडवण्याच्या कामी सरकारला साथ द्यावी. ते जमत नसेल तर महाराष्ट्रद्रोही चाळे तरी बंद करावेत, असं देशमुख यांनी विरोधकांना सुनावलं आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात स्पष्ट कौल देणाऱ्या महाराष्ट्रापुढं आम्ही नतमस्तक आहोत. सत्तेत राहण्यासाठीचे गणित आम्ही वर्षापूर्वीच जुळवले; आता भरभक्कम लोकसमर्थनही मिळवले. कालही आम्ही जनतेपुढे विनम्र होतो, आजही आहोत आणि सदैव राहू, असंही त्यांनी सांगितलं.

एकजुटीमुळे यश मिळालं: अजित पवार

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड हे ४९ हजार मताधिक्क्यानं, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतिश चव्हाण हे ५८ हजार मताधिक्क्यानं विजयी झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे. महाविकास आघाडीचे अन्य उमेदवारही आघाडीवर असून त्यांचा विजयही लवकरच जाहीर होईल, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय हा आघाडीतील सर्व पक्षांच्या एकजूटीचा व राज्यातील जनतेच्या सरकारवरील विश्वासाचं प्रतिक असल्याचे सांगून, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी केल्याबद्दल सर्व मतदारांचे, राज्यातील जनतेचे त्यांनी आभार मानले.

महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती: सुप्रिया सुळे

विधानपरिषदेच्या निवडणुकीतील यश ही मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती आहे, असा दावा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. आघाडीच्या उमेदवारांवर विश्वास टाकल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी सर्व मतदारांचे आभारही मानले आहेत. या यशासाठी अहोरात्र कष्ट करणारे कार्यकर्ते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी कष्ट घेतले. सर्वांच्या सुनियोजित अशा संघटीत प्रयत्नातून हा विजय साकारला आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

तीन पक्ष एकत्र आल्यावर काय होते हे निकालाने दाखवून दिले: जयंत पाटील

या राज्यातील शेतकरी… कष्टकरी… कामगार व मध्यमवर्गीय यांच्यासोबतच उच्चशिक्षित मतदारदेखील महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभा आहे. हेच या निकालाने सिद्ध होते, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विधानपरिषद निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालं आहे. जनमताचा हा कौल आम्ही नम्रपणे स्वीकारत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान हा विजय महाविकास आघाडीसाठी कष्ट घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना आणि मतदारांना जयंत पाटील यांनी समर्पित केला आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस एकत्र आल्यावर काय होते, हेही या निकालाने दाखवून दिले आहे, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे. महाविकास आघाडीच्या तीनही पक्षातील व मित्रपक्षातील सर्व कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे पाटील यांनी अभिनंदन करतानाच महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत. (anil deshmukh slams bjp over graduate constituency election result)

संबंधित बातम्या:

पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवून दिली; रोहित पवारांचा टोला

तीन पक्षांच्या आघाडीमुळे समीकरणं बदलली, ऑपरेशन लोटस बारगळणार?; भाजपची डोकेदुखी वाढली

MLC Election Maharashtra 2020 Result LIVE | ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा नाही – फडणवीस

(anil deshmukh slams bjp over graduate constituency election result)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.