Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या याचिकेवर गुरुवारी निकाल, CBI ने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी देशमुखांची सर्वोच्च न्यायालयात याचिका
मागील दीड महिन्यापासून देशमुखांच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. त्याबाबत आता गुरुवारी निकाल येण्याची शक्यता आहे.
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध मनी लॉड्रिंग प्रकरणात CBIने गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर आता सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी निकाल येण्याची शक्यता आहे. मागील दीड महिन्यापासून देशमुखांच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. त्याबाबत आता गुरुवारी निकाल येण्याची शक्यता आहे. (Supreme Court is likely to rule on Anil Deshmukh’s plea on Thursday)
मनी लॉर्डिंग प्रकरणात अनिल देशमुखांविरोधात CBI कडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका देशमुखांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. तसंच या गुन्ह्यातील दोन कलम रद्द करण्यासाठी राज्य सरकारकडूनही याचिका दाखल करण्यात आलेली आहे. देशमुखांच्या याचिकेवर सुनावणी पार पडली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवरील निकाल राखीव ठेवला आहे. त्याचा निकाल गुरुवारी देण्यात येईल अशी शक्यता आहे.
300 नाही, 4 कोटीची संपत्ती जप्त – देशमुख
मनी लॉर्डिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबईतील संपत्ती ईडीने जप्त केली आहे. मुंबईतील घर आणि उरण परिसरातील जमीन अशी मिळून 4 कोटी 20 लाख रुपये किमतीची मालमत्ता जप्त केल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलं. मात्र, या संपत्तीची बाजारभावाप्रमाणे आजची किंमत ही 300 कोटीच्या वर असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे देशमुख यांची 4 नाही तर तब्बल 300 कोटी रुपयाची संपत्ती जप्त केल्याचं बोललं जात आहे. याबाबत स्वत: अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलंय. आपली 300 कोटी नाही तर फक्त 4 कोटीची संपत्ती ईडीने तात्तपुरती जप्त केल्याचं देशमुख म्हणाले.
‘सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ईडीसमोर जाणार’
ईडीने माझ्या परिवाराची अंदाजे 4 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मुलगा सलील देशमुख याने 2006 मध्ये 2 कोटी 67 लाख रुपयाची जमीन खरेदी केली होती. ती जमीन ईडीने जप्त केली आहे. पण काही वर्तमानपत्रात 2 कोटी 67 लाख रुपयांची जमीन 300 कोटीची दाखवून गैरसमज पसरवले जात आहे, असं देशमुख यांनी म्हटलंय. तर मला ईडीचे समन्स आले होते. त्याविरोधात मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याचा जो निकाल येईल त्यानंतर मी स्वत: ईडीसमोर माझा जबाब नोंदवायला जाणार आहे, असं देशमुख यांनी म्हटलंय.
Video : Breaking | पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्तीची परीक्षा 8 ऑगस्टला, शिक्षणमंत्र्यांची माहिती https://t.co/y2dMLWmlYJ @VarshaEGaikwad @CMOMaharashtra @OfficeofUT #scholarship #ScholarshipExams #VarshaGaikwad
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 20, 2021
संबंधित बातम्या :
ईडीची पहिली मोठी कारवाई, अनिल देशमुखांची 4 कोटींची संपत्ती जप्त
ज्या अनिल देशमुखांची ईडीनं 4 कोटींची संपत्ती जप्त केली, ते नेमक्या किती प्रॉपर्टीचे धनी?
Supreme Court is likely to rule on Anil Deshmukh’s plea on Thursday