सक्तवसुली संचलनालयाचा ससेमिरा रोखण्यासाठी अनिल देशमुखांची सर्वोच्च न्यायालयात धाव

अनिल देशमुख यांना 5 जुलै रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशावेळी ईडीचा ससेमिरा रोखण्यासाठी आता अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. तशी माहिती देशमुख यांच्या वकिलांनी दिली आहे.

सक्तवसुली संचलनालयाचा ससेमिरा रोखण्यासाठी अनिल देशमुखांची सर्वोच्च न्यायालयात धाव
अनिल देशमुख, माजी गृहमंत्री
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 9:57 PM

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून तिसरं समन्स बजावण्यात आलंय. त्यात देशमुख यांना 5 जुलै रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशावेळी ईडीचा ससेमिरा रोखण्यासाठी आता अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. तशी माहिती देशमुख यांच्या वकिलांनी दिली आहे. आपल्याविरोधात कारवाई करु नये म्हणून ही याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिलीय. (Anil Deshmukh’s petition in the Supreme Court)

अनिल देशमुख यांना ईडीने दोनदा समन्स बजावलं होतं. आधी त्यांनी प्रकृती ठिक नसल्याचं कारण देऊन ईडीच्या चौकशीला गैरहजर राहिले होते. नंतर त्यांनी सात दिवसाची मुदत मागवून घेतली होती. येत्या सोमवारी 5 जुलै रोजी त्यांची ही मुदत संपत आहे. त्यामुळे ईडीने काल त्यांना समन्स बजावलं असून सोमवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे देशमुख सोमवारी ईडीच्या चौकशीला सामोरे जातात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर आता देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत आपल्याविरोधातील कारवाई थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय.

देशमुखांच्या पीएंना अटक

दरम्यान, एप्रिल महिन्यात आधी देशमुख यांची सीबीआयने चौकशी केली होती. त्यानंतर आता देशमुख यांची ईडीने चौकशी सुरु केली आहे. 25 जून रोजी ईडीने देशमुख यांच्या पाच ठिकाणांवर छापेमारी केली. त्यानंतर ईडीने देशमुख (Anil Deshmukh) यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे (Kundan Shinde) आणि संजीव पालांडे (Sanjeev Palande) यांना अटक केली. अंमलबजावणी संचालनालय मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्या (PMLA) अंतर्गत शिंदे आणि पालांडे यांना अटक करण्यात आली.

देशमुखांच्या मुलालाही समन्स

अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ ऋषिकेश देशमुख यांनाही समन्स आल्यानं चर्चांना उधाण आलंय. अनिल देशमुख यांना समन्स पाठवण्यात आल्यानंतर आता ऋषिकेश देशमुख यांना समन्स पाठवण्यात आल्यानं पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. दोघांना वेगवेगळ्या तारखांचं समन्स बजावण्यात आलंय. ऋषिकेश देशमुख यांना 6 जुलै, तर अनिल देशमुख यांना 5 जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स आहे.

“मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यात ऋषिकेश देशमुख याचा हात”

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “ईडीच्या तपासात सचिन वाझे याच्याकडून आलेला पैसा संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्याकडे जायचा. त्यानंतर तो वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत ऋषिकेश देशमुख यांच्या कंपन्या आणि ट्रस्टमध्ये आल्याचं समोर आलंय. त्यामुळे या मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यात ऋषिकेश देशमुख याचा हात असल्याचं स्पष्ट झालंय. त्याचमुळे त्यांना समन्स बजावण्यात आलं आहे.”

संबंधित बातम्या :

अनिल देशमुखांना ईडीकडून तिसरं समन्स, हजर राहण्याचे आदेश; देशमुख दिल्लीला रवाना?

सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करा, देशमुखांच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी

Anil Deshmukh’s petition in the Supreme Court

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.