मोदींवर गोध्रा, अमित शाहांवर सोहारुबुद्दीन-लोहिया खटल्याचे आरोप, आदित्य ठाकरेंची इमेज खराब करण्याचा प्रयत्न : अनिल परब

"नरेंद्र मोदी यांच्यावरही गोध्रा हत्याकांडाचे आरोप झाले. अमित शाह यांचेही नाव सोहराबुद्दीन प्रकरणात समोर आले. न्यायमूर्ती लोहिया केसमध्येही शाह यांच्यावर आरोप झाले." असे दाखले अनिल परबांनी दिले.

मोदींवर गोध्रा, अमित शाहांवर सोहारुबुद्दीन-लोहिया खटल्याचे आरोप, आदित्य ठाकरेंची इमेज खराब करण्याचा प्रयत्न : अनिल परब
Follow us
| Updated on: Aug 04, 2020 | 4:07 PM

मुंबई : “युवा नेत्याचे नाव खराब करायचे, मुख्यमंत्र्यांची इमेज खराब करण्यासाठी हे षडयंत्र आहे. मात्र सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाशी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा संबंध नाही” असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ठणकावून सांगितले. (Anil Parab on Aditya Thackeray name linked with Sushant Singh Rajput Death Case)

“हे सगळं बिहार निवडणुकीसाठी सुरु आहे. आम्ही मुंबई पोलिसांच्या पाठीशी ठाम आहोत. मुंबई पोलीस तपासासाठी सक्षम आहेत. सीबीआयची मागणी कोणीही केली म्हणून केस त्यांच्याकडे देता येत नाही, त्याची कारणे द्यावी लागतात” असे अनिल परब म्हणाले.

“गेल्या पाच वर्षात किती आत्महत्या झाल्या? त्यापैकी किती तपास सीबीआयकडे दिले? गेल्या पाच वर्षात किती हत्याकांड झाले? केवळ राजकारण म्हणून हे सुरु आहे.” असा दावा अनिल परब यांनी केला. “नितीश कुमार हे महाराष्ट्र पोलिसांचे प्रमुख नाहीत. त्यांनी त्यांच्या राज्याबाबत भाष्य करावे.” असेही ते म्हणाले.

“केवळ युवा नेत्याचे नाव खराब करायचे, मुख्यमंत्र्यांची इमेज खराब करण्यासाठी हे षडयंत्र आहे. पुरावे असतील तर पोलिसांकडे द्यावे. नरेंद्र मोदी यांच्यावरही गोध्रा हत्याकांडाचे आरोप झाले. अमित शाह यांचेही नाव सोहराबुद्दीन प्रकरणात समोर आले. न्यायमूर्ती लोहिया केसमध्येही शाह यांच्यावर आरोप झाले.” असे दाखले अनिल परबांनी दिले.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

“सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा संबंध नाही. कोण म्हणते ते पार्टीला गेले, कोण म्हणते नाही गेले. ज्यांच्याकडे पुरावे आहेत, त्यांनी ते मीडियासमोर घेऊन सिद्ध करावे. एखाद्याचे करिअर खराब करण्याचा प्रकार आहे. ट्रोलर्सविरोधात काही कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या आहेत” असे अनिल परब यांनी सांगितले. (Anil Parab on Aditya Thackeray name linked with Sushant Singh Rajput Death Case)

“अमृता फडणवीसांनी खुशाल राज्य सोडावे”

“सरकार बदलले तरी पोलीस तेच राहतात. ज्यांची सुरक्षा घेऊन त्या गेली पाच वर्ष फिरल्या, त्या पोलिसांवरच अविश्वास असेल, तर अमृता फडणवीसांनी खुशाल राज्य सोडून जावे” असे अनिल परब म्हणाले.

“देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांची सतत स्तुती केली, शाबासकी दिली. त्या पोलिसांबद्दल केवळ खुर्ची गेली म्हणून असे बोलणे चुकीचे आहे. अमृता फडणवीसांना असुरक्षित वाटावे असे काय घडले? कुठला मुंबईचा नागरिक म्हणतो की त्यांना असुरक्षित वाटते. ही खुर्ची गेल्याची तडफड दिसते” असा टोला अनिल परब यांनी लगावला.

“अडवाणींना निमंत्रण दिलंय का?”

राम मंदिर उभारण्याचा पाया शिवसेनेनं रचला आहे, कळसही आम्हीच चढवू. शिवसेनेला निमंत्रण आले नाही, पण आधी लालकृष्ण अडवाणींना निमंत्रण दिलंय का तपासावे लागेल, असा टोलाही अनिल परब यांनी लगावला.

पहा व्हिडीओ :

(Anil Parab on Aditya Thackeray name linked with Sushant Singh Rajput Death Case)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.