देवेंद्र फडणवीसांच्या प्रत्येक दाव्याला अनिल परब यांचं प्रत्युत्तर

शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या सर्व आरोपांवर सडेतोड प्रत्युत्तर दिले. Anil Parab Press Conference LIVE

देवेंद्र फडणवीसांच्या प्रत्येक दाव्याला अनिल परब यांचं प्रत्युत्तर
Follow us
| Updated on: May 27, 2020 | 6:21 PM

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडून महाराष्ट्र सरकारला दिलेल्या मदतीची (Anil Parab Press Conference LIVE) माहिती दिली. यानंतर आज शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या सर्व आरोपांवर प्रत्युत्तर दिले.

या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि (Anil Parab Press Conference LIVE) महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील तर शिवसेनेकडून परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित  होते.

देवेंद्र फडणवीस यांचे प्रश्न, अनिल परब यांची उत्तरे

देवेंद्र फडणवीस – पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत गहू, तांदूळ आणि डाळ असे मिळून राज्य सरकारला मोठी मदत केली.

अनिल परब – हा निर्णय केवळ महाराष्ट्रासाठी झालेला नाही. हा संपूर्ण देशासाठी निर्णय घेण्यात आला. त्याचा फायदा महाराष्ट्राला झाला. पण देवेंद्र फडणवीस यांनी 1750 कोटी रुपयांचे गहू मिळाले असं सांगितलं. मात्र, महाराष्ट्र सरकारला 1750 कोटींचे गहू मिळालेले नाहीत. गहू महाराष्ट्राला मिळालेला नाही.

देवेंद्र फडणवीस – स्थलांतरित मजुरांच्या नियोजनासाठी 122 कोटी रुपये दिले.

अनिल परब – स्थलांतरित मजुरांना पैसे देण्याचा निर्णय चार दिवसांपूर्वी घेण्यात आला. अजून एफसीएममधून धान्य निघालेले नाही. याशिवाय मजूर आपापल्या घरी पोहोचले आहेत. त्यामुळे हेदेखील पैसे महाराष्ट्राला मिळणार नाहीत.

देवेंद्र फडणवीस प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत आम्ही 1726 कोटी रुपये दिले.

अनिल परब –  ही योजना अगोदरची आहे. या योजनेत टप्प्या टप्प्याने पैसे देत होते. 6000 त्यांना दोन हजारांच्या टप्प्या-टप्प्याने देत होते. त्याचे पैसे त्यांनी महाराष्ट्राला अॅडवान्समध्ये दिले. म्हणजे यात त्यांनी महाराष्ट्राला वेगळी काहीही मदत केलेली नाही.

देवेंद्र फडणवीस – विधवा, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी 116 कोटी दिले.

अनिल परब  – या योजनेत फक्त 20 टक्के केंद्र सरकार देते. 116 कोटी केंद्राने दिले. पण त्याच बरोबर 1210 कोटी हे महाराष्ट्र सरकारने दिले. म्हणजे 20 टक्के केंद्र सरकार देतं आणि उर्वरित 80 टक्के राज्य सरकार देते. त्यामुळे केंद्र सरकारच्या 116 कोटींची माहिती दिली. मात्र, महाराष्ट्र सरकार 1210 कोटी रुपये देते हे सांगायला ते सोयीस्करपणे विसरले.

देवेंद्र फडणवीस – महाराष्ट्रातून 600 श्रमिक ट्रेन सुटल्या. प्रत्येक ट्रेनमागे केंद्राला 50 लाख रुपये खर्च, राज्याने केवळ तिकीटाचा 7 ते 9 लाख रुपये खर्च केला.

अनिल परब – 600 श्रमिक ट्रेन सुटल्या. यातल्या 24 मे, 25 आणि 26 मे रोजी किती सुटल्या याचाही ही हिशोब घ्या. या सर्व ट्रेनचे पैसे महाराष्ट्र सरकारने दिले. महाराष्ट्र सरकारने 68 कोटी रुपये ट्रेनचा खर्च दिला आहे. आजपर्यंत केंद्राने यातला कोणताही खर्च दिलेला नाही. एका ट्रेनला 50 लाख रुपये खर्च कोणता येतो याचा हिशोब पत्रकारांनी त्यांच्याकडे मागावा. कोणत्याही श्रमिकाकडून पैसे घेतलेले नाहीत. हा संपूर्ण खर्च महाराष्ट्र सरकारने केला.

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला केंद्राकडून 19 हजार कोटी मिळाले.

अनिल परब – हे पैसे कुठे मिळाले, कधी मिळाले, कोणच्या अकाऊंटला गेले हे कृपया त्यांनी सांगावं. महाराष्ट्र सरकारच्या हक्काचे १९-२० वर्षाचे १८ हजार २७९ कोटी हे अजून मिळायचे आहेत. हे अजून मिळालेले नाही. यावर्षाचे म्हणजे एप्रिल मे चे केवळ 2359 कोटी रुपये मिळाले आहेत. हे दोन महिन्याचे आहेत. त्यामुळे १८,२७९ कोटी हक्काचे पैसे महाराष्ट्राला अजून मिळालेले नाही. ते मिळाले तरी पुष्कळ आहेत. त्याची आम्ही मागणी करतो ते मिळालेले नाही.

देवेंद्र फडणवीस – शेतमाल खरेदीसाठी देण्यात आलेला निधी कापूस 5647 कोटी, इतर धान, चणा, तूर, पीक बाकीचे 9 हजार कोटी हे दिले आहेत

अनिल परब – कापसाचे जे नुकसान होतं. त्याचे पैसे केंद्र सरकार देते. ते पण पाच वर्षाने देते. इतर धान, चणा, तूर, पीक याचा त्यांचा काहीही संबंध नाही. ९ हजार कोटी कापूस, धान, चणा-मका अशा शेतमाल खरेदीसाठी दिल्याचा दावा खोटा आहे.

देवेंद्र फडणवीस – केंद्राने कायद्यात बसत नसतानाही नोव्हेंबरपर्यंत पैसे दिलेले नाही.

अनिल परब – कायद्यात नसलेले पैसे देऊ नका. पण जे बसत आहेत ते तर पैसे द्या. जे १८,२७९ कोटी हक्काचे आहेत ते द्या. कायद्यात बसणारे पैसे मिळालेले नाही.

देवेंद्र फडणवीस – जीडीपीच्या 5 टक्के कर्ज घेता येईल, म्हणजे महाराष्ट्राला 1 लाख 60 हजार कोटींची कर्ज घेता येईल.

अनिल परब – कर्ज घ्यायला यांच्याकडे आम्हाला शिकवणी लावायची गरज आहे का? आमच्याकडे एवढे अर्थतज्ज्ञ आमच्याकडे बसले आहेत. त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे. उलट जीडीपीच्या 5 टक्क्यांपैकी 3 टक्क्यांती प्रोव्हीजन पूर्वीपासून होती. त्यामध्ये 0.5 कोणत्याही अटीविना मिळतंय. पण उरलेलं वरचं दीड टक्क्यांसाठी तुम्हाला अटी-शर्ती आहेत. यासाठी 4 अटी-शर्ती आहेत. त्यामुळे राज्य कर्जाच्या खाईत जाईल. मोठ-मोठे आकडे बोलायचे आणि अभास निर्माण करायचं. हे पूर्ण चुकीचं आहे.

देवेंद्र फडणवीस – पैसे नाहीत म्हणून शेतकरी, बाराबलुतेदार अशी ओरड करता येणार नाही. कर्नाटक, गुजरात, केंद्रशासित छत्तीसगडने योजना जाहीर केली आहे.

अनिल परब – आम्ही तर महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत 12 हजार कोटी रुपये वाटले. ही योजना अगोदरच केली आहे. याशिवाय उरलेल्या पैशांचीही कर्जमुक्ती केलेली आहे. राज्य सरकारने बँकेला हमी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस – राज्याला सूक्ष्म मध्यम लघु उद्योगजकांना 35 हजार कोटीचे कर्ज घेता येईल

अनिल परब – परत त्यांनी कर्ज घेण्याचे सल्ले दिले आहेत. आम्हाला केंद्र सरकारने काय दिले. महाराष्ट्र संपूर्ण देशाच्या तुलनेत ३५ टक्के महसूल पाठवतो.  त्याबदल्यात तुम्ही काय देणार आहे ते सांगा.

देवेंद्र फडणवीस – आतापर्यंत केंद्राने 5 कोटी राज्याला दिले आहेत. 

अनिल परब – तुम्ही हक्काचे पैसे परत द्या. तेच मी सांगतो

देवेंद्र फडणवीस – पीपीई कीट, N 95 मास्कचा पुरवठा केंद्राने केला आहे. 

अनिल परब – सुरुवातीला आम्हाला असं सांगितलं होतं की, या सर्व गोष्टी आम्ही  देणार आहोत. मार्चपर्यंत ज्या गोष्टी आम्हाला आल्या, त्याचे पैसे आम्ही दिले. १ एप्रिलपासून फक्त पीपीई कीट आणि N 95  मास्क किती टक्के दिले याची माहिती तुम्हाला नंतर देऊ. या व्यक्तिरिक्त जे काही केंद्राकडून येतं, त्याचे पैसे राज्याला केंद्राला द्यायचे आहेत.

देवेंद्र फडणवीस –  मजुरांच्या छावणीसाठी 1611 कोटीचा निधी दिला.

अनिल परब –  केंद्र प्रत्येक राज्याला आपत्कालीन परिस्थिती निधीतून पैसे देते. त्यापैकी 1611 कोटी दिले असे सांगितले. दरवर्षी राज्याला 4600 कोटीचा निधी येतो. तो पूर, अतिवृष्टी या आपत्कालीन परिस्थिती असल्या की येतो. त्यातील फक्त 1611 कोटी दिले आहेत. हे वेगळे पैसे नाही.

देवेंद्र फडणवीस – EPFO साठी एकूण 1001 कोटी दिले आहेत.

अनिल परब –  याची फक्त घोषणा झालेली आहे. हे अजूनही कोणाकडे आलेले नाहीत 

देवेंद्र फडणवीस – SDRF मध्ये 1611 कोटी आरोग्यासाठी 448 कोटी दिले.

अनिल परब  – हे 1611 कोटी कोटी त्यांच्या भाषणात किती वेळा आलेत हे तुम्ही तपासून पाहा. हे पाच वेळा म्हटलं आहेत. आता हे पैसे आपत्कालीन परिस्थिती निधीतून दरवर्षी राज्याला 4600 कोटीचा निधी येतो. त्यापैकी  1611 कोटी दिलेत. 

देवेंद्र फडणवीस –  MSEM, Discom, Campa Emplyoment या सर्व काही आहे त्यात 78500 कोटी महाराष्ट्राला मिळतील.

अनिल परब  – हे सर्व पैसे हवेत आहेत. हे सर्व आभासी आहेत. ते कसे मिळणार हे आम्हाला माहिती आहे. त्यासाठी केंद्र सरकारने काहीही वेगळे उपकार केलेले नाही.

देवेंद्र फडणवीस – केंद्राच्या पॅकेज मधील 78 हजार कोटी असे एकूण 2 लाख 71 हजार 500 कोटीचा लाभ महाराष्ट्राला मिळू शकतो. 

अनिल परब  – हे सर्व आभासी पैसे आहे. यातले किती पैसे मिळतील याचा आम्हाला चांगला अंदाज आहे.

(Anil Parab Press Conference LIVE)

संबंधित बातम्या : 

फडणवीसांच्या आकडेवारीची सोप्या भाषेत चिरफाड करु : परिवहन मंत्री अनिल परब

Devendra Fadnavis | केंद्राकडून महाराष्ट्र सरकारला एकूण 28 हजार 104 कोटी रुपये, देवेंद्र फडणवीसांनी लेखाजोखा मांडला

फडणवीसांची आकडेवारी आभासी, महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न : महाविकास आघाडी

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.