भाजपची कित्येक ठिकाणी डिपॉझिट जप्त झालीय, त्यांनी आत्मपरीक्षण केलं तर आम्हीसुद्धा करु : अनिल परब
बिहार विधानसभा निवडणुकीवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं (Anil Parab slams BJP).
रत्नागिरी : बिहार विधानसभा निवडणुकीवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बिहार निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालेल्या शिवसेनेवर काय बोलायचे? अशी टिका फडणवीस यांनी केली होती. त्यावर बोलताना “अशी कित्येत ठिकाणी त्यांची डिपॉझिट जप्त झाली आहे. त्यांनी जर आत्मपरीक्षण केलं असेल तर आम्ही सुद्धा करु”, असा उपरोधीत टोला परब यांनी लगावला (Anil Parab slams BJP).
बिहार विजयानंतर ‘अब की बार महाराष्ट्र’ असा ध्येय भाजपचा असल्याची चर्चा आहे. याबाबत अनिल परब यांना प्रश्न विचारला असता ‘अब की बार महाराष्ट्र’ पाच वर्षांनी, अशी मिश्किल टीप्पणी परब यांनी केली. ते आज (11 नोव्हेंबर) रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते (Anil Parab slams BJP).
“शिवसेना बिहारमध्ये प्रमुख पक्ष म्हणून लढलेली नाही. एका जमान्यात भाजपचे सुद्धा फक्त दोनच खासदार होते. यश-अपयश, चढ-उतार होत असतात. ज्या पक्षाचे दोन खासदार होते त्या पक्षाचा आज पंतप्रधान बसलाय. त्यामुळे मतांवरुन मोजमाप होवू शकत नाही. एका जमान्यात महाराष्ट्रात बीजेपीची काय परिस्थिती होती हे माहित आहे ना?”, असा चिमटा अनिल परब यांनी काढला.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?
“मला वाटतं की शिवसेनेची परिस्थिती चित हो गयी, तो भी मेरी टांग उपर अशी झाली आहे. मला काही बोलायचं नाही. अनेक लोक ज्यांचं डिपॉझिट वाचलं नाही, नोटापेक्षा कमी मतं मिळाली, त्यांनी आत्मचिंतन करावं. भाजप मोठा पक्ष आहे, केवळ बिहारमध्ये नाही, तर देशात पोटनिवडणुकांमध्ये जनतेने नरेंद्र मोदींवर विश्वास टाकला” , असं फडणवीस म्हणाले.
“लॉकडाऊनमध्ये जनता त्रासली होती, सर्व राजकारणी नरेंद्र मोदींवर टीका करत होते, मात्र त्याची पर्वा न करता त्यांनी गरिबांना मदत केली. टीका करणाऱ्यांनी मोदी काय करतात हे पाहून आत्मचिंतन करावं” असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी दिला होता.
संबंधित बातम्या :
महिला मतदारांमुळे बिहारच्या एक्झिट पोल्सचे अंदाज चुकले, देवेंद्र फडणवीसांचे निरीक्षण
अर्णवने मराठी बाईचं कुंकू पुसलं, किरीट सोमय्यांचा हत्याऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न : अनिल परब