एसटी कामगार ते कोकणचा गणेशोत्सव, फडणवीसांचा दिल्ली दौरा ते UGC, रोखठोक अनिल परब
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 450 ते 500 कोटी मिळणे आवश्यक आहे, असेही अनिल परब (Anil Parab On Konkan Ganeshotsav, UGC Exam Decision, ST Worker) म्हणाले.
मुंबई : परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 450 ते 500 कोटी रुपयांची मागणी सरकारकडे केली आहे. याशिवाय कोकणातील गणेशोत्सव, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा, तसेच परीक्षा घेण्याच्या UGC निर्णयाविरोधात याचिका यावरही अनिल परब यांनी भाष्य केलं. (Anil Parab On Konkan Ganeshotsav, UGC Exam Decision, ST Worker)
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 500 कोटी मिळणे आवश्यक
“एसटी महामंडळ आधीच तोट्यात होते. कोरोना प्रादुर्भावात हा तोटा आणखी वाढला आहे. कोरोना काळात वाहतूक पूर्ण बंद होती. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 292 कोटी रुपये लागतात. आज उत्पन्न नसल्यामुळे मला शासनाकडून मदत मागावी लागते आहे. जोपर्यंत एसटीची सेवा पूर्ववत होत नाही तोपर्यंत शासनाने महामंडळाला मदत करावी. जेणेकरून कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होतील,” अशी मागणी अनिल परब यांनी केली आहे.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री अजित पवार या दोघांकडे मदतीची मागणी करत आहे. त्याबाबत सकारात्मक निर्णय येईल. गेल्या सहा महिन्यात एसटीचा अंदाजे 2 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. आता तातडीने कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 450 ते 500 कोटी मिळणे आवश्यक आहे,” असेही अनिल परब म्हणाले. (Anil Parab On Konkan Ganeshotsav, UGC Exam Decision, ST Worker)
एसटी कर्मचाऱ्यांच्या भरतीला तात्पुरती स्थिगिती
“एसटीमध्ये 4 हजार कामगारांची भरती झालीच नव्हती ती भविष्यातील प्रोजेक्शन होते. आणखी किती लोक लागू शकतात,” असे स्पष्टीकरण अनिल परब यानी दिले.
“जसे नवे कर्मचारी आवश्यक असतात, काही लोक रिटायर होतात, नवे प्रवासी मार्ग सुरू होतात, नव्या गाड्या सुरू होतात त्यावेळी कर्मचारी लागतात. ते दृष्टीक्षेपात ठेवत ही भरती प्रक्रिया सुरू झाली होती. हे सगळे लोक वेटींग लिस्टवरचे आहेत. त्यांना सेवेत घेतलेले नाही. या वेटींग लिस्टला तात्पुरती स्थगिती दिली आहे, कारण एसटीच्या गाड्याच सध्या सुरू नाहीत. पण जेव्हा सगळं सुरळीत होईल तेव्हा वेटींग लिस्टमधील सिनियरटीनुसार त्यांना सेवेत घेणार आहोत,” असेही ते म्हणाले.
कोकणात जाण्यावर बंदी नाही
“कोरोना प्रादुर्भाव असताना गणपतीनिमित्त कोकणात जाताना काही नियम-अटी असल्या पाहिजेत. त्या नियम अटींचे पालन करून उत्सव साधेपणाने साजरा करावा असे शासनाचे धोरण आहे. ICMR आणि आरोग्य विभागाच्या गाईडलाईन्सनुसार 14 दिवसांचा क्वारंटाईन काळ आहे. याबाबतीत राज्य सरकार काय करू शकतं यासाठी सूचना मागवल्या आहेत. सूचना आल्यानंतर मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील,” असेही अनिल परब यांनी स्पष्ट केलं.
“गणेशोत्सव हा कोकणासाठी मोठा सण आहे. त्याचं पावित्र्य जपत आणि कोणाच्या आरोग्याला धोका होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल,” असेही अनिल परब म्हणाले. (Anil Parab On Konkan Ganeshotsav, UGC Exam Decision, ST Worker)
“कोकणात जाण्यावर कुणाची बंदी नाही आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ठरवलेल्या नियमांचे पालन करून कोणी कुठेही जाऊ शकता. ई-पास ने जाऊ शकता. नियमाप्रमाणे क्वारंटाईन व्हावे लागते. त्या नियमांमध्ये काही शिथिलता द्यायची की नाही याबाबत राज्य सरकार निर्णय घेईल,” असेही ते म्हणाले.
आमचा विरोधी पक्षनेत्यांवर विश्वास
“मी प्रसारमाध्यमातून ऐकलं की विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा राजकीय नव्हता. त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा, आमचा विरोधी पक्षनेत्यांवर विश्वास आहे. त्यांनी साखरेच्या विषयावर चर्चा केली असं सांगितलं ते आम्ही सत्य मानतो,” असाही टोला अनिल परब यांनी लगावला.
विद्यार्थ्यांचे आयुष्य टांगणीला लागू नये यासाठी ही याचिका
“परीक्षा घेण्याच्या UGC निर्णयाविरोधात ही याचिका आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आयुष्य टांगणीला लागू नये यासाठी ही याचिका आहे. परीक्षा घेण्यासारखी आज परिस्थिती नाही. तरीदेखील परीक्षा घेण्याचा UGC हट्ट करत असेल तर सर्वोच्च न्यायलयात दाद मागावी लागणार,” असेही अनिल परब म्हणाले. (Anil Parab On Konkan Ganeshotsav, UGC Exam Decision, ST Worker)
VIDEO : सचिन सावंत यांचा भाजप नेत्यांवर गंभीर आरोप, प्रविण दरेकरांचं प्रत्युत्तरhttps://t.co/D264IYQ9zy
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 18, 2020
संबंधित बातम्या :
आधी मिशन धारावी, आता ध्येय पुणे, पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी इक्बाल सिंह चहल यांची मदत