Ramdas kadam : सेनेला पुन्हा धक्का, रामदास कदम यांच्याकडून शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा

Ramdas kadam : शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का बसलाय. शिवसेनेचे नाराज नेते रामदास कदम हे शिवसेनेतून बाहेर पडले असून त्यांनी पक्षाता सद्यपदाचा राजीना दिला आहे. हा मोठा धक्का आहे. 

Ramdas kadam : सेनेला पुन्हा धक्का, रामदास कदम यांच्याकडून शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा
सेनेला पुन्हा धक्काImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 2:37 PM

मुंबई :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गट शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडल्यापासून सेनेला वारंवार धक्के बसतायत. पुन्हा शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का बसलाय. शिवसेनेचे नाराज नेते रामदास कदम (Ramdas kadam) हे शिवसेनेतून बाहेर पडणार असल्याची माहिती होती.  अखेर शिवसेना नेते रामदार शिंदे यांनी शिवसेनेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिली आहे. महाराष्ट्रातील सत्ता गमावलेल्या शिवसेनेला आणखी वारंवार धक्क्यांवर धक्के बसतयात. कदम हे माजी विरोधी पक्षनेते आणि माजी मंत्री आहेत. शिवसेनेच्या नेतेपदावर देखील रामदास कदम होते. दरम्यान, कदम लवकरच पक्षाचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलं होतं आणि अखेर त्यांनी राजीनामा दिलाय. रामदास कदम काही वेळातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी राजीनामा पाठलं आहे. याआधी कदम यांचे पुत्र आणि आमदार योगेश गुवाहाटीतील शिंदे कॅम्पमध्येच दाखल झाले होते. ते शिंदे गटासोबत आहेत

रामदास कदम यांचं पत्र

दोन दिवसांत पत्रकार परिषद घेणार

रामदास कदम येत्या 2 दिवसांत पत्रकार परिषद आयोजित करून त्यात सविस्तर भूमिका मांडणार आहेत. शिवसेनेत नेत्यांचे राजीनामा सत्र सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वी आनंदराव अडसूळ यांनी नेतेपदाचा राजीनामा दिला होता.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेत मोठं पद

रामदास कदम हे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेतेही राहिले आहेत. त्यांना फडणवीस सरकारमध्ये मंत्री करण्यात आले. रामदास कदम यांचा मुलगा योगेश दापोलीतून आमदार आहे. एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या गुवाहाटीला पोहोचलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमध्ये त्यांचा समावेश होता.

अनिल परबांवर गंभीर आरोप

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषदेत अनिल परब यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. अनिल परब हे शिवसेना संपवायला निघालेत, असंही रामदास कदम म्हणाले होते. त्यानंतर आता अलीकडेच राज्यात एकनाथ शिंदे यांचा बंड झालं आणि ठाकरेंच्या शिवसेनेतला एक मोठा गट शिंदेंसोबत गेला आणि राज्यात नवं सरकार उदयाला आलं. शिंदेंसोबत गेलेल्या या गटात आमदार योगेश कदम हेही होते. योगेश कदम यांनीही अनिल परब यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते. अनिल परब हे राष्ट्रवादीला हाताशी धरून शिवसेना संपवत आहेत, असा थेट आरोप योगेश कदम यांनी केला होता.

शिवसेनेतील बंड

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली होती. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसह ते सुरत, त्यानंतर तेथून गुवाहाटी येथे पोहोचले. शिवसेना फुटल्यामुळे उद्धव यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले. यानंतर भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे यांच्या छावणीत 50 आमदार आहेत. यामध्ये शिवसेनेच्या 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदारांचा समावेश आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.