तुम्ही कोणालाही विकत घेऊ शकत नाही, आमदार फुटण्याचा काळ आता संपला : संजय राऊत
तुम्ही कोणलाही विकत घेऊ शकत नाही," असं वक्तव्य शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेदरम्यान (Sanjay Raut Press Confernence) केले.
मुंबई : “गेल्या काही वर्षांपासून आम्ही कोणलाही फोडू शकतो. आम्ही कोणलाही विकत घेऊ (Sanjay Raut Press Confernence) शकतो. किंबहुना आम्ही बहुमत विकत घेऊ शकतो असे चित्र निर्माण झाल होतं. मात्र त्या भ्रमाचा भोपळा फुटलेला आहे. त्यामुळे तुम्ही कोणलाही विकत घेऊ शकत नाही,” असं वक्तव्य शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेदरम्यान (Sanjay Raut Press Confernence) केले.
“आमदारांच्या फुटण्याचा काळ आता संपलेला आहे. निवडून आलेले सर्वजण आपपल्या पक्षाच्या विचारांशी भूमिकांशी प्रामाणिक आहेत आणि ते राहतील. तसेच आता हे सर्व प्रयत्न झाल्यानंतर सगळे शांत झाले आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.”
तसेच “काँग्रेसचे आमदार फुटतील असे मला वाटत नाही. कोणीही कितीही अफवांच्या पुड्या सोडल्या तरीही ते फुटणार नाहीत असेही वक्तव्य संजय राऊत यांनी केले.”
राज्यात भाजप-शिवसेनेचा सत्तासंघर्ष अद्याप कायम आहे. सत्तास्थापन करण्यासाठी राज्यपालांकडून भाजपला आमंत्रित करण्यात आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, “भाजप सर्वात मोठा पक्ष आहे, म्हणून त्यांना आमंत्रण दिलं आहे. राज्यपालांकडून भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी 11 नोव्हेंबर रात्री 8 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.”
“भाजप सत्तेत आहे, सर्वात मोठी पक्ष असल्याच्या नाते त्यांनी 24 तासात सत्ता स्थापनेचा दावा करायला हवा होता. मात्र 15 दिवसांनंतरही त्यांनी हे पाऊल न उचल्याने राज्यपालांनी हे पाऊल उचललं आहे आणि आम्ही त्याचे स्वागत करतो, असेही संजय राऊत (Sanjay Raut Press Confernence) म्हणाले.”
“सत्तेसाठी भाजपकडे बहुमत नाही असं मला वाटत नाही. त्यांच्याकडे बहुमत नसतं तर त्यांनी वारंवार मुख्यमंत्री भाजपचा होईल, सरकार आमंच येईल अशी विधान केली नसती. अशी खरपूस टीकाही राऊत यांनी भाजपवर केली. तसेच राम मंदिर हा देशाचा मुद्दा आहे. त्यामुळे तो देशाचा विजय आहे,” असेही ते म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे द रीट्रिट हॉटेलमध्ये जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. उद्धव ठाकरे यावेळी हॉटेलमध्ये जाऊन आमदारांशी संवाद साधणार आहे. सर्व आमदार हे आमच्या कुटुंबाचा घटक आहे. त्यामुळे त्यांच्याशी राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे मालाडच्या हॉटेलमध्ये जाणार आहेत. असेही त्यांनी सपष्ट केले.
संबंधित बातम्या :
राज्यपालांकडून सत्तास्थापनेची विचारणा, भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय घेणार