Shiv Sena : पक्षाकडून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, पण आम्हाला नाहीत मान्य त्या..! जळगाव जिल्हा प्रमुखाच्या घरासमोरच शिवसैनिकांचा ठिय्या

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर आता स्थानिक पातळीवरही बदल होण्यास सुरवात झाली आहे. त्याच अनुशंगाने जळगाव जिल्हाप्रमुख यांनी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर केली. पण भुसावळ तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांना ह्या नियुक्त मान्य नाही.

Shiv Sena : पक्षाकडून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, पण आम्हाला नाहीत मान्य त्या..! जळगाव जिल्हा प्रमुखाच्या घरासमोरच शिवसैनिकांचा ठिय्या
जळगाव जिल्हाप्रमुखांनी केलेल्या पदाधिकारी नियुक्त्या मान्य नसल्याचे म्हणत भुसावळ तालुक्यातील शिवसैनिकांनी त्यांच्या घरसमोर ठिय्या दिला आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 10:19 PM

जळगाव :  (Shivsena) शिवसेनेतील बंड आता थंड झाल्यानंतर नव्याने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करुन पक्ष संघटनेवर भर दिला जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा प्रमुखांकांकडून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. अशाच पद्धतीने (Jalgaon District) जळगाव जिल्हा प्रमुखांनी पदाधिकाऱ्यांची नियुक्त्या पण भुसावळ तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी हे झालेल्या नियुक्त्यांवर समाधानी नाहीत. खऱ्या शिवसैनिकाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका शिवसैनिकांनी घेतली असून नियुक्त्यांमध्ये फेरबदल करावा या मागणीसाठी त्यांनी थेट जिल्हा प्रमुखांच्या घराबाहेरच ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे (Party organization) पक्ष संघटन करताना स्थानिक नेतृत्वापासून ते पक्षप्रमुखांना देखील तारेवरची कसरत करावी लागत आहे. पदाधिकाऱ्यांची नाराजी बाजूला सारुन मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

नेमके काय झाले नियुक्त्यांमध्ये?

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर आता स्थानिक पातळीवरही बदल होण्यास सुरवात झाली आहे. त्याच अनुशंगाने जळगाव जिल्हाप्रमुख यांनी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर केली. पण भुसावळ तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांना ह्या नियुक्त मान्य नाही. गेल्या 40 वर्षापासून शिवसेना कार्यकर्ते आहेत. परंतु आमचा विचार केला जात नाही नवीन येणाऱ्यांना प्राधान्य दिले जाते. पद दिले जातात असा अन्याय आम्ही सहन करणार नाही असा इशारा देत त्यांनी आंदोलनास सुरवात केली आहे.

नवख्यांना संधी, एकनिष्ठतेचे काय?

पक्षामध्ये नव्याने प्रवेश केला त्यांची लागलीच नियुक्ती केली जात आहे. मात्र, नियुक्त्या करताना त्याने पक्षासाठी दिलेले योगदान, एकनिष्ठता याचाही अभ्यास होणे गरजेचे असल्याचे मत शिवसैनिक व्यक्त करीत आहेत. शिवाय काम करणारे बाजूलाच पण चमकोगिरी करणाऱ्यांचा सन्मान हीच गोष्ट शिवसैनिकांना खटकलेली आहे. त्यामुळे भुसावळ तालुक्यात झालेल्या नियुक्त्या ह्या काही शिवसैनिकांना ह्या मान्यच नाहीत. त्यामुळे यावर काय तोडगा काढला जाणार हे पहावे लागणार आहे.

जिल्हाप्रमुखांच्या घरासमोरच ठिय्या

गेल्या 40 वर्षापासून पक्ष संघटनेचे काम आणि एकनिष्ठतेचे फळ हे मिळालेच पाहिजे. नव्याने येणाऱ्यांची थेट नियुक्ती हे अमान्य असल्याचे म्हणत भुसावळ येथील काही शिवसैनिकांनी थेट जिल्हा प्रमुख यांच्या घरासमोरच ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरु होते. त्यामुळे या नियुक्त्यांमध्ये वरीष्ठ हस्तक्षेप करणार का हे देखील पहावे लागणार आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.