Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: तुम्ही खरच एकटं लढणार आहात का?…तसं स्पष्ट सांगा; पवारांची काँग्रेस नेत्यांना विचारणा

काँग्रेसचे तीन महत्त्वाचे नेते मंगळवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटले. तब्बल अर्धा तास या नेत्यांनी पवारांशी चर्चा केली. यावेळी शरद पवारांनी या नेत्यांना नेमका सवाल केला. (sharad pawar)

VIDEO: तुम्ही खरच एकटं लढणार आहात का?...तसं स्पष्ट सांगा; पवारांची काँग्रेस नेत्यांना विचारणा
sharad pawar
Follow us
| Updated on: Jul 14, 2021 | 10:46 AM

मुंबई: काँग्रेसचे तीन महत्त्वाचे नेते मंगळवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटले. तब्बल अर्धा तास या नेत्यांनी पवारांशी चर्चा केली. यावेळी शरद पवारांनी या नेत्यांना नेमका सवाल केला. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचीही भंबेरी उडाली. तुम्ही खरंच एकटं लढणार आहात का?, असा सवालच शरद पवारांनी केला असल्याचं सूत्रांनी सांगितलं. पवारांनी काँग्रेस नेत्यांना थेट सवाल केल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. (are you contesting alone?, sharad pawar ask congress leaders)

काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काल शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतली. या चारही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याचं कळतं. या बैठकीत ओबीसींच्या आरक्षणावर चर्चा झाली. त्यानंतर राज्य सरकारचा कारभार आणि एकूण तीन पक्षातील वादावर चर्चा झाली. त्याचवेळी पवारांनी एक महत्त्वाचा प्रश्न या तिन्ही काँग्रेसच्या नेत्यांना केला. तुम्ही खरंच एकटं लढणार आहात का? तसं स्पष्ट सांगा. नाना पटोलेंना दिल्ली हायकमांडने काही अधिकार दिले आहेत का?, असा सवाल पवारांनी या तिन्ही नेत्यांना केला, असं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

पवार असा प्रश्न विचारतील असं वाटत नाही

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार आहे. देशाचे काँग्रेसचे प्रभारी जेव्हा राज्यात येतात तेव्हा ते मित्र पक्षांच्या नेत्यांच्याही गाठीभेटी घेत असतात. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे ते त्यांना भेटले. या भेटीत ओबीसींच्या प्रश्नावर चर्चा झाली. त्यावेळी इतर विषयही निघाले असतील. ते स्वाभाविक आहे. पटोले आणि पवार साहेबांशी संबंधित विषयांवरही चर्चा झाली आहे, असं सांगतानाच युती, आघाडी करायचा निर्णय पक्ष नेतृत्व घेत असते. त्यामुळे पवार असा प्रश्न विचारतील असं वाटत नाही. आघाडीचा निर्णय हा नेहमीच अंतिम टप्प्यावर होत असतो. 2014मध्येही अंतिम टप्प्यावर निर्णय झाला होता. त्यावेळी आम्ही वेगळे लढलो होतो. त्याआधीही तसंच झालं होतं, असं काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी सांगितलं.

काँग्रेस एकटी पडली

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तिथे नेमकी काय चर्चा झाली. हे माहीत नाही. पटोले यांनी त्यांच्या मनातील आणि कार्यकर्त्यांच्या मनातील भावना सांगितली. कितीही काही केलं काहीही दाखवण्याचा प्रयत्न केला तरी तिन्ही पक्षात अंतर्गत काय चाललं हे लोकांना कळून चुकलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी एका बाजूला असून काँग्रेस एकटी पडलेली दिसत आहे. काँग्रेस फरफटत जात आहे की काय असं दिसत आहे, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला.

तो वाद अधोरेखित केला

काँग्रेसमध्येही दुमत आहे. नानांनी जाहीर भूमिका मांडू नये ही अपेक्षा आहे. तसेच इतर काँग्रेसच्या नेत्यांनीही चार भिंतीत बोलणं आवश्यक होतं. नानांनी तीन पक्षाचा वाद चव्हाट्यावर आणला, तसं काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदही चव्हाट्यावर आणले. आता महाविकास आघाडीत विसंवाद असल्याचं पवारांच्या दरबारात जाऊन अधोरेखित करण्यात आलं आहे, असंही दरेकर यांनी सांगितलं. (are you contesting alone?, sharad pawar ask congress leaders)

संबंधित बातम्या:

महाविकास आघाडीतील कुरबुरी पवारांच्या दरबारात?; काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट

काल माजी राज्यमंत्र्याने शिवसेना सोडली, आता चार टर्म आमदार पक्षावर नाराज

नाना रांगडे गडी, ते काय बोलतात आणि कसे डोलतात यावर सरकारचं भवितव्य अवलंबून नाही : संजय राऊत

(are you contesting alone?, sharad pawar ask congress leaders)

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.