सल्ले द्यायला लाज वाटत नाही का? Sandeep Deshpande यांचा विरोधकांना टोला
आम्ही आघाडी सरकार विरोधात सातत्याने आवाज उठवत आहोत. त्यामुळे आमचा आवाज दाबण्यासाठी सरकारनं गुन्हे दाखल केले होते.
संदीप देशपांडे यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यापद्धतीचं राजकारण (Politics) हे ज्यांची फार लहान बुद्धी आहे त्याचं राजकारण आहे. असं संदिप देशपांडे (Sandeep Deshpande) यावेळी म्हणाले. यावेळी प्रश्न विचारत असता पत्रकरांनी संदिप देशपांडे यांनी जेव्हा तुम्ही फरार होतात तेव्हा असा प्रश्न विचारायला जाताच संदिप देशपांडे यांनी त्यांना रोखत भूमिगत म्हणा भुमिगत. फरार या शब्दाची व्याख्या काय, त्याचा अर्थ काय हे एकदा समजुन घेऊया. एखाद्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो सापडत नाही, तेव्हा त्याला फरार असं म्हणतात. आणि भूमिगत म्हणाल तर आता भावना गवळी ही भुमिगत आहेत. अनिल देशमुख पण होते. आम्ही पळून गेलो नव्हतो. आम्ही कायदेशीर सल्लामसलत करत होतो. कायद्याने आम्हाला कायदेशीर अधिकार दिला आहे. तो अधिकार आम्ही वापरू नये का?, असा सवाल त्यांनी केला. आतापर्यंत भावना गवळी काय नाही समोर आल्या चौकशीला? अनिल देशमुख किती दिवस लपून होते? ते तर गृहमंत्री होते. प्रताप सरनाईक काय लगेच चौकशीला सामोरे गेले होते का? आम्हाला सल्ले देताना तुम्हाला लाज नाही वाटत? असा सवाल त्यांनी केला.