Arjun Khotkar | डोळ्यात अश्रू, मनावर ओझं, ज्या कुटुंबासाठी खोतकरांनी ठाकरेंची साथ सोडली, त्यांची प्रतिक्रिया वाचली का?
कुटुंबासाठीच मी शिंदे गटाला समर्थन द्यायचा निर्णय घेतोय, हे सांगताना अर्जुन खोतकरांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या या भावनिक क्षणी संपूर्ण कुटुंबही भावनिक झालं. या वेळी खोतकरांचे आई, भाऊ, मुलगा, मुलगी आणि पत्नी यांच्याही डोळ्यात अश्रू आले. पण या प्रत्येकाने आपण कोणत्याही संकटात त्यांच्या पाठिशी आहोत, असे सांगितले.
जालनाः राजकारण बाहेर होतं, पण घरी आल्यावर कुटुंब दिसतं… डचणीतला माणूस आधार शोधत असतो. मीसुद्धा तो शोधलाय. माझ्यावर आणि कुटुंबावर ताण आहे. यातून तुम्ही काय समजायचं ते समजून घ्या. असा वारंवार सूचक इशारा दिल्यानंतर अखेर जालन्याचे शिवेसना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना समर्थन देतोय, असं माध्यमांसमोर सांगितलं. मागील 40 वर्षांपासून मी उद्धव ठाकरेंचा सच्चा शिवसैनिक (Shivsena) आहे. पण राजकारण बाहेर असतं आणि घरी आल्यावर कुटुंब दिसतं. त्यामुळे कुटुंबासाठीच मी शिंदे गटाला समर्थन द्यायचा निर्णय घेतोय, हे सांगताना अर्जुन खोतकरांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या या भावनिक क्षणी संपूर्ण कुटुंबही भावनिक झालं. या वेळी खोतकरांचे आई, भाऊ, मुलगा, मुलगी आणि पत्नी यांच्याही डोळ्यात अश्रू आले. पण या प्रत्येकाने आपण कोणत्याही संकटात त्यांच्या पाठिशी आहोत, असे सांगितले.
खोतकरांचं कुटुंबही रडलं, काय आहेत प्रतिक्रिया?
- मी त्यांच्या प्रत्येक निर्णय त्यांच्यासोबत होते आणि आहे. कितीही अडचण आली तरी आम्ही त्याच्यावर मात करू. साहेब 40 वर्ष ज्या पक्षात काम केले तो पक्ष सोडताना वाईट वाटतेय. संपूर्ण कुटुंब खोतकर साहेबांच्या सोबत आहोत. – पत्नी सीमा खोतकर
- माझा मुलगा जो निर्णय घेईल त्याच्या आम्ही पाठीशी आहोत. आम्ही त्याला इतक्या अडचणीत असलेलं कधी पाहिलं नव्हतं. – आई कासाबाई खोतकर
- 40 वर्ष पक्षात आम्ही काम केलं. ते सोडताना आम्हाला खूप वाईट वाटतंय. काही अपरिहार्य कारणामुळे आम्ही पक्ष सोडतोय. शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच आम्ही हा निर्णय घेतला आहे. साखर कारखाना सुरू व्हावा ही आमची इच्छा आहे. दादांच्या या निर्णयामुळे जर कारखाना सुरू झाला तर आम्हाला आनंदच आहे. – भाऊ संजय खोतकर
- बाबांच्या आयुष्यात अनेक अडचणी संघर्ष आला. मात्र ते कधीही डगमगले नाहीत. जरी काही अडचणीमुळे आम्ही पक्ष बदलत असलो तरी शहराच्या विकासासाठी कायम झटत राहणार संपूर्ण कुटुंब म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोतच. त्यांना सल्ला देणे इतपत आम्ही मोठी नाही आहोत मात्र त्यांनी आम्हाला शिंदे गटात जाण्याबाबत विचारले. – मुलगी दर्शना खोतकर-झोल
- आम्ही जरी शिंदे गटात गेलो असलो तरी उद्धव ठाकरे साहेब किंवा त्यांच्या कुटुंबीयांवर टीका करणार नाही. मी स्वतः आदित्य ठाकरे साहेबांची भेट घेतली आणि त्यांना याबाबत सांगितले. काही अडचणीमुळे आम्ही शिंदे गटात गेलोय. मात्र असे असले तरी पक्ष किंवा संघटने विरोधात आम्ही काही बोलणार नाही – अभिमन्यू खोतकर ( मुलगा)