अरुण जेटली यांची प्रकृती स्थिर, प्रकृती चौकशीसाठी राष्ट्रपती एम्समध्ये

माजी अर्थमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley) यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांच्यावर दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्समध्ये (AIIMS) उपचार सुरु आहेत.

अरुण जेटली यांची प्रकृती स्थिर, प्रकृती चौकशीसाठी राष्ट्रपती एम्समध्ये
Follow us
| Updated on: Aug 16, 2019 | 2:48 PM

नवी दिल्ली :  माजी अर्थमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley) यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांच्यावर दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्समध्ये (AIIMS) उपचार सुरु आहेत. जेटलींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे सकाळी एम्समध्ये पोहोचले. राष्ट्रपतींनी जेटलींच्या प्रकृतीची विचारपूस केली.

अरुण जेटली यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना 9 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी एम्समध्ये जाऊन विचारपूस केली होती.

अरुण जेटली यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. एक आठवड्यापूर्वीच एम्सने जेटलींचं हेल्थ बुलेटीन जारी करत प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर मात्र आजपर्यंत त्यांच्या प्रकृतीची काहीही माहिती देण्यात आलेली नाही.

66 वर्षीय अरुण जेटली हे मोदींच्या पहिल्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते. जेटलींची किडनी प्रत्यार्पण झाली आहे. आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांच्याकडील अर्थ खात्याचा भार पियुष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आला होता. यावर्षीच फेब्रुवारी महिन्यात जेटली उपचारासाठी परदेशात गेले होते. त्यामुळे ते अंतरिम बजेटही मांडू शकले नव्हते.

मोदी सरकार पुन्हा सत्तेत आलं तेव्हा जेटलींनी पत्र लिहून प्रकृतीच्या कारणास्तव कोणतीही जबाबदारी किंवा मंत्रीपद घेण्यास नकार दिला होता.

अरुण जेटलींच्या प्रकृतीबाबत स्पष्ट कोणी बोलण्यास तयार नाही. मात्र वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या फुप्फुसात संसर्ग झाल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. जेटलींना मधुमेह अर्थात डायबेटीजही आहे.त्यात त्यांची किडनी प्रत्यार्पण झाली आहे. शिवाय त्यांना पेशींचा कर्करोगही झाला होता. त्याआधी त्यांच्यावर लठ्ठपणा कमी करण्यासाठीही शस्त्रक्रिया झाली होती.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.