Byelection Results 2022: पंजाबमध्ये केजरीवालांना, यूपीत अखिलेश यादवना धक्का, देशभरातल्या पोटनिवडणूक निकालाचे 10 मोठे मुद्दे

पंजाबमधील संगरूर लोकसभा जागेच्या पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. येथे आम आदमी पार्टीचे उमेदवार गुरमेल सिंग यांचा शिरोमणी अकाली दल (अमृतसर) उमेदवार (Candidate) सिमरनजीत सिंग मान यांच्याकडून 8101मतांनी पराभव झाला. अकाली दल (अमृतसर) मधून पक्षप्रमुख सिमरनजीत सिंग मान रिंगणात होते.

Byelection Results 2022: पंजाबमध्ये केजरीवालांना, यूपीत अखिलेश यादवना धक्का, देशभरातल्या पोटनिवडणूक निकालाचे 10 मोठे मुद्दे
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 4:32 PM

मुंबई : पाच राज्ये आणि दिल्लीतील तीन लोकसभा आणि सात विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे (Byelection Results 2022) निकाल आज जाहीर होत आहेत. यामध्ये पंजाबमध्ये केजरीवालांना तर यूपीमध्ये अखिलेश यादव यांना धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर लोकसभा (Loksabha) मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला आहे. येथे भाजपने समाजवादी पक्षाचा मोठा पराभव केला आहे. पंजाबमधील संगरूर लोकसभा जागेच्या पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. येथे आम आदमी पार्टीचे उमेदवार गुरमेल सिंग यांचा शिरोमणी अकाली दल (अमृतसर) उमेदवार (Candidate) सिमरनजीत सिंग मान यांच्याकडून 8101 मतांनी पराभव झाला. अकाली दल (अमृतसर) मधून पक्षप्रमुख सिमरनजीत सिंग मान रिंगणात होते.

देशभरातल्या पोटनिवडणूक निकालाचे 10 मोठे मुद्दे वाचा!

  1. 1. उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये भाजपचे उमेदवार घनश्याम लोधी 40,000 मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. आझमगडमध्ये पक्षाचे उमेदवार दिनेश लाल यादव निरहुआ सध्या आघाडीवर आहेत. यामुळे हा अखिलेश यादवांना मोठा धक्का मानला जातो.
  2. 2. दोन्ही जागा अखिलेश यादव यांच्या पक्षाच्या बालेकिल्ल्या आहेत. मात्र, तिथेच अखिलेश यांना पराभवाचा सामना करावा लागणार आहे. राज्य विधानसभेसाठी निवडून आल्यानंतर आझमगडची जागा रिक्त झाली होती, तर रामपूरची जागाही रिक्त होती.
  3. 3. विधानसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपने तीन तर काँग्रेसने एक जागा जिंकली आहे. थोड्यात काय तर पोटनिवडणुकीत भाजप नंबर एकचा पक्ष ठरणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत.
  4. 4. त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा, ज्यांना आपले पद टिकवून ठेवण्यासाठी निवडून येण्याची अत्यंत गरज होती, त्यांनी बरदोवलीमध्ये 6,000 पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे माणिक साहा यांना मोठी मते देखील मिळाली आहेत.
  5. हे सुद्धा वाचा
  6. 5. दिल्लीतील राजिंदर नगर पोटनिवडणुकीत आम आदमी पार्टीचे (आप) उमेदवार दुर्गेश पाठक 11 हजार मतांनी विजय मिळवला आहे. ही आम आदमी पार्टीसाठी आनंदाची बातमी आहे. कारण पंजाबमध्ये अनपेक्षित निकाल लागला आहे.
  7. 6. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा बालेकिल्ला असलेल्या संगरूर येथे शिरोमणी अकाली दलाचे (अमृतसर) उमेदवार सिमरनजीत सिंग मान यांनी 7,000 हून अधिक मतांनी विजय मिळवला. येथे आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे.
  8. 7. संगरूर लोकसभा जागेच्या पोटनिवडणुकीत 45.30 टक्के इतके कमी मतदान झाले होते. जे 2019 लोकसभा निवडणुकीत 72.44 टक्के आणि 2014 मध्ये 76.71 टक्के मतदान झाले होते. यावेळी 15.69 लाख मतदार होते.
  9. 8. झारखंडमधील आमदार बंधू तिर्की यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर त्यांना अपात्र घोषित केल्यानंतर पोटनिवडणूक घेण्यात आली. काँग्रेसने शिल्पी नेहा तिर्की यांना सत्ताधारी JMM नेतृत्वाखालील युतीची उमेदवार म्हणून उमेदवारी दिली, तर भाजपने माजी आमदार गंगोत्री कुजूर यांना उमेदवारी दिली. असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) चे समर्थन असलेले अपक्ष उमेदवार देव कुमार धन यांनीही झारखंड पोटनिवडणूक लढवली.
  10. 9. दिल्लीच्या राजिंदर नगरमध्ये भाजपचे उमेदवार राजेश भाटिया हे या भागातील माजी नगरसेवक होते. काँग्रेसच्या उमेदवार प्रेम लता होत्या. दिल्लीतील राजिंदर नगरमध्ये भाजपाला मोठा धक्की बसला आहे. आम आदमी पार्टीचा उमेदवार येथे विजयी झाला आहे.
  11. 10. फेब्रुवारीमध्ये उद्योगमंत्री मेकापती गौतम रेड्डी यांचे निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी आंध्र प्रदेशमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यांचा लहान भाऊ विक्रम रेड्डी हे सत्ताधारी वायएसआर काँग्रेसचे उमेदवार आहेत. भाजपचे उमेदवार जी भरतकुमार यादव आहेत.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.