भाजपला अहंकाराने हरवलं : खासदार अरविंद सावंत

मुंबई : भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला असून, त्याच अहंकाराच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर आहे, असे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘महाराष्ट्र महामंथन’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात शिवसेना खासदार अरविंद सावंत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक सहभागी झाले होते. अरविंद सावंत काय म्हणाले? भाजपची वेळ […]

भाजपला अहंकाराने हरवलं : खासदार अरविंद सावंत
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:50 PM

मुंबई : भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला असून, त्याच अहंकाराच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर आहे, असे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘महाराष्ट्र महामंथन’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात शिवसेना खासदार अरविंद सावंत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक सहभागी झाले होते.

अरविंद सावंत काय म्हणाले?

भाजपची वेळ वाईट आली आहे, त्यामुळे ते शिवसेनेला टाळी देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण 2014 मध्ये युतीत खोडा घालणारे कोण होतं, ते त्यांनी शोधावं, असे म्हणत अरविंद सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच, शिवसेना कुणाच्या बाजूने नाही, तर सत्याच्या बाजूने आहे, असेही अरविंद सावंत म्हणाले.

“नमो की रागा , 10 पैकी कुणाला किती गुण द्याल?” असा प्रश्न अरविंद सावंत यांना विचारला असता, ते म्हणाले, “कुणालाच नाही. कारण ज्याला सोनं म्हटलं ते पितळ निघालं, ज्याला पितळ समजलं ते कधीही सोनं होईल की नाही माहित नाही.”

यावेळी, शिवसेनेच्या तारेवरच्या कसरतीचं कौतुक, सत्तेतही राहायचं आणि विरोधही करायचा, असा टोमणा जयंत पाटील यांनी अरविंद सावंत यांना लगावला असता, “तारेवरची कसरत आम्ही राष्ट्रवादीकडूनच शिकलो”, असे उत्तर अरविंद सावंत यांनी दिले.

आणखी महत्त्वाचे मुद्दे :

  • भाजपची वेळ वाईट आली आहे, त्यामुळे ते शिवसेनेला टाळी देण्याचा प्रयत्न करत आहेत, पण 2014 मध्ये युतीत खोडा घालणारे कोण होतं, ते त्यांनी शोधावं – खा. अरविंद सावंत
  • शिवसेना कुणाच्या बाजूने नाही, तर सत्याच्या बाजूने – खा. अरविंद सावंत
  • शेतकऱ्यांच्या त्रासाकडे दुर्लक्ष करणं हा अंहकार – अरविंद सावंत
  • भाजपचा पराभव अहंकारामुळे, त्या अहंकारामुळेच शिवसेना रस्त्यावर – खा. अरविंद सावंत
  • आम्ही मतांसाठी राम मंदिर बांधत नाही – अरविंद सावंत
  • काँग्रेसचा विजय हा लोकांचा भाजपावरचा राग आहे – अरविंद सावंत
  • आमची युती होणार नाही, आम्ही आमच्या पायावर उभे राहू – अरविंद सावंत
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.