Kirit Somaiya : “हिसाब तो देना पडेगा” राऊतांची ईडीची नोटीस येताच सोमय्यांचं ट्विटही लगेचच आलं!

गेल्या आठ दिवसांपासून एकनाथ शिंदे यांचे बंड सुरु झाल्यापासून भाजपाने सावध पवित्रा घेतला आहे. राज्याच्या राजकारणावरच नाही पण संजय राऊतांबद्दल कायम आक्रमक असलेले किरीट सोमय्या हे देखील शांत होते. मात्र, आता बंडखोर आमदारांनी पाठिंबा काढताच सरकार अल्पमतात येणार असे चित्र निर्माण होताच भाजपामध्ये हलचाली सुरु झाल्या आहेत.

Kirit Somaiya : हिसाब तो देना पडेगा राऊतांची ईडीची नोटीस येताच सोमय्यांचं ट्विटही लगेचच आलं!
भाजप नेते किरीट सोमय्या आणि खा. संजय राऊत
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 1:52 PM

मुंबई: राजकीय घडामोडींना वेग येत असतानाच (Sanjay Raut) संजय राऊत यांना (ED Notice) ईडीने नोटीस बजावली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जमिन घोटाळाप्रकरणी ईडीने नोटीस बजावण्यात आली होती. तर आता चौकशीसाठी त्यांना मंगळवारी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. असे असताना गेल्या काही दिवसांपासून शांत असलेले भाजपा नेते (Kirit Somaiya) किरीट सोमय्या पुन्हा अॅक्टीव झाले आहेत. ईडीकडून राऊतांना समन्स मिळताच, हिसाब तो देना पडेगा असे म्हणत सोमय्या आणि राऊत यांच्यातील ट्विट युध्दाला पुन्हा सुरवात होणार असल्याचे चित्र आहे. एकनाथ शिंदे गटाकडून सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर आता भाजपा नेते समोर येऊ लागले आहेत. मात्र, किरीट सोमय्या यांनी सध्याच्या राजकीय उलथापालथीवर प्रतिक्रिया न देता संजय राऊतांनाच टार्गेट केले आहे. राज्याचे राजकारण ढवळून निघत असतानाच पुन्हा ट्विट युध्द पाहवयास मिळणार हे नक्की आहे.

काय म्हणलं आहे सोमय्यांनी..?

सध्याच्या राजकीय परस्थितीवर एक चकार शब्द न काढता सोमय्या यांनी थेट ‘हिसाब तो देना पडेगा’ म्हणत केलेल्या घोटाळ्या प्रकरणी कारवाईला तर सामोरे जावेच लागणार असल्याचे म्हणले आहे. एवढेच नाहीतर तुम्ही मला, पत्नीला, मुलगा नीलला आणि आईला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. आम्हाला धमक्या द्या, हल्ले करा, शिव्या द्या पण आता “हिसाब तो देना पडेगा ” अशा आशयाचे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे. मध्यंतरी संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यातील वाद टोकाला गेला होता. त्यानुसार आता संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावून मंगळवारी सकाळी चौकशीसाठी हजर राहण्याचे सांगितले आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघत असतानाच राऊतांना मात्र वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

किरीट सोमय्या पुन्हा सक्रिय..!

गेल्या आठ दिवसांपासून एकनाथ शिंदे यांचे बंड सुरु झाल्यापासून भाजपाने सावध पवित्रा घेतला आहे. राज्याच्या राजकारणावरच नाही पण संजय राऊतांबद्दल कायम आक्रमक असलेले किरीट सोमय्या हे देखील शांत होते. मात्र, आता बंडखोर आमदारांनी पाठिंबा काढताच सरकार अल्पमतात येणार असे चित्र निर्माण होताच भाजपामध्ये हलचाली सुरु झाल्या आहेत. यातच संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर अवघ्या काही वेळातच सोमय्या यांनी ट्विट करुन राऊतांना केलेल्या जमिन घोटाळप्रकरणी हिशोब तर होणारच असेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

राऊंताकडून काय प्रतिउत्तर

ईडी कार्यालयाकडून संजय राऊत यांना नोटीस बजावण्यात तर आलीच आहे पण मंगळवारीच चौकशीला हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे. सध्याच्या राजकीय घडामोडीत राऊत हे चौकशीला जातील का याविषयी चर्चा होत असतानाच ते वेळ वाढवून मागणार असल्याचे समोर आले आहे. मंगळवारी नियोजित बैठका आणि सभा असल्याने चौकशीला येऊ शकणार नाही असे म्हणत त्यांनी वेळ वाढवून मागितली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.