अजित पवारांना जो प्रश्न पडला, ते तुषार भोसले खरंच कोण आहेत? वाचा सविस्तर

पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, कोण आहेत तुषार भोसले? असा सवाल करून अजितदादांनी भोसले यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. त्यामुळे तुषार भोसले हे चर्चेत आले आहेत.

अजित पवारांना जो प्रश्न पडला, ते तुषार भोसले खरंच कोण आहेत? वाचा सविस्तर
उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 12:03 AM

मुंबई : यंदाच्या आषाढी वारीसंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय वारकऱ्यांना मान्य नाही. सरकारने हा निर्णय तातडीने बदलावा. अन्यथा रस्त्यावर असंख्य पालख्या उतरतील, असा इशारा भाजपप्रणित अध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी दिला होता. त्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, कोण आहेत तुषार भोसले? असा सवाल करून अजितदादांनी भोसले यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. त्यामुळे तुषार भोसले हे चर्चेत आले आहेत. (Who is Tushar Bhosle who warned the state government on Ashadi Wari? )

कोण आहेत तुषार भोसले?

तुषार भोसले हे भाजपच्या आध्यात्मिक आघाडचे प्रमुख आहेत. आध्यात्मिक क्षेत्रातील ते आचार्य आहेत. त्यांना देण्यात आलेल्या आचार्य पदवीबाबतही वाद झाला होता. तसेच तुषार भोसले यांचं खरं नाव तुषार शालीग्राम पितांबर असल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. ते बहुजन समाजाचे नसून ब्राह्मण असल्याच्या चर्चाही मधल्या काळात रंगल्या होत्या. त्यांनी वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज यांच्याकडे वेदांचे शिक्षण घेतले आहे. ते जगन्नाथ महाराजांचे पट्टशिष्य म्हणून ओळखले जातात. त्यांनी पुढील शिक्षण मुंबईतील भारतीय विद्याभवनमधून घेतले आहे. वयाच्या 17व्या वर्षी अखंड 365 दिवस प्रवचन देण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

भारतीय विद्याभवनने त्यांना 2012 रोजी अद्वैत वेदांतात शास्त्री ही पदवी दिली. 2014मध्ये त्यांना आचार्य ही पदवी मिळाली. त्यांनी या दोन्ही पदव्या अध्ययन करून मिळविल्या असल्याचं सूत्रांनी सांगितलं. ते कीर्तनकार, प्रवचनकार आणि संत साहित्याचे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. तसेच प्रखर हिंदुत्ववादी नेता म्हणूनही त्यांची प्रतिमा तयार होत आहे.

मंदिरे सुरु करण्याच्या मागणीवरुन आक्रमक

यापूर्वी कोरोना संकटामुळे राज्यातील मंदिरं बंद करण्यात आल्यानंतर तुषार भोसले यांनी सुरु करण्याच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली होती. राज्यातील मद्यालये सुरु होतात, मग मंदिरं का नाही? असा सवाल त्यांनी राज्य सरकारला केला होता. तसंच तुळजाभवानी देवीच्या मंदिरासमोरुन त्यांनी आंदोलनाला सुरुवातही केली होती.

तुषार भोसलेंबाबत अजित पवार काय म्हणाले?

तुषार भोसले यांनी वारीबाबत सरकारला इशारा दिल्यावरुन पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला. त्यावेळी कोण आहेत तुषार भोसले? असा सवाल पवारांनी केला. त्यावर ते भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख असल्याचं सांगण्यात आलं. त्यावर, कोणत्याही राजकीय व्यक्तीने काही सांगितलं तर ते कितपत गांभीर्याने घ्यायचं ते वेगळं आहे. आम्ही सर्वांनी वारकरी संप्रदायाशी चर्चा केली आहे. कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे त्यांना निर्बंधांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे, असं पवार म्हणाले.

संबंधित बातम्या :

यंदाही पायी वारी नाहीच? मानाच्या दहाही पालखी संस्थानांचा सरकारच्या निर्णयाला अखेर पाठिंबा, पण……….

वारीची परंपरा टिकली पाहिजे, पण कुंभमेळ्यात घडलं त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून दक्षता: अजित पवार

Who is Tushar Bhosle who warned the state government on Ashadi Wari?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.