होय, तुम्हाला हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज आहे : आशिष शेलार

भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे. "होय, आज तुमच्या हिंदुत्वाची भेसळ झाल्याने तुम्हाला प्रमाणपत्राची खरी गरज आहे," अशी टीका आशिष शेलार यांनी केली

होय, तुम्हाला हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज आहे : आशिष शेलार
Follow us
| Updated on: Oct 13, 2020 | 6:20 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तुमच्याकडून हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचं सांगितले. यानंतर आता भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे. “होय, आज तुमच्या हिंदुत्वाची भेसळ झाल्याने तुम्हाला प्रमाणपत्राची खरी गरज आहे,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली (Ashish Shelar criticize CM Uddhav Thackeray on Hindutv issue).

आमदार आशिष शेलार म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज खरंच हिंदुत्वाचे प्रमाणपत्र घेण्याची वेळ आलेली आहे. याचे कारण हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वापासून त्यांनी केव्हाच फारकत घेतली आहे. त्यांनी त्याची प्रतारणा केली आहे. तुम्हाला हे नाकारता येणार नाही, या मुंबईवर आणि भारतावर हल्ला करणाऱ्या याकुबला फाशी झाली त्यावेळी त्याच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळात घेतले आहे.”

“हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही मांडीवर घेऊन बसलात आहात. तुम्हाला हेही नाकारता येणार नाही की, कसाबला बिर्याणी खायला घातली त्यांच्याशी तुम्ही संगनमत केले आहे. ज्यावेळी पंढरपूरला पुजेला गेलात त्यावेळी आमच्या विठूरायाच्या चरणाला स्पर्शही केला नाही हे तुम्हाला नाकारता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला प्रमाणपत्राची खरंच गरज आहे. तुमच्या हिंदुत्वाची भेसळ झालेय, देव भूमीतून आलेल्या राज्यपाल महोदय भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमाणपत्राची तुम्हाला खरंच गरज आहे. ही काळाची गरज आहे,” असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यातील मंदिरं सुरु करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात हिंदुत्वाचा उल्लेख केला होता. राज्यापालांच्या पत्राला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी अभिनेत्री कंगना रानौतच्या वक्तव्याचा धागा पकडत राज्यपालांना प्रत्युत्तर दिलंय. ‘माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत स्वागत करणं हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही’, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपालांना दिलंय.

संबंधित बातम्या: 

उद्धव ठाकरे राज्यपालांवर कडाडले, मुख्यमंत्र्यांच्या पत्रातील मोठे मुद्दे

माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, उद्धव ठाकरे राज्यपालांवर बरसले

उद्धव ठाकरे हिंदूहृदयसम्राटांचे पुत्र, त्यांना हिंदुत्वाचे धडे गिरवण्याची गरज नाही : राऊत

Ashish Shelar criticize CM Uddhav Thackeray on Hindutv issue

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.