‘तक्रारदार स्थानबद्ध, गावगुंड राज्यभर मुक्त’, आशिष शेलारांचा घणाघात

भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राज्यात 'तक्रारदार स्थानबद्ध आणि गावगुंड राज्यभर मुक्त', अशी स्थिती निर्माण झाल्याचा घणाघाती आरोप शेलार यांनी केलाय.

'तक्रारदार स्थानबद्ध, गावगुंड राज्यभर मुक्त', आशिष शेलारांचा घणाघात
आशिष शेलार, आमदार, भाजप
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 4:03 PM

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याचा प्रयत्न आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सोमय्यांना रोखण्याचे आदेश या पार्श्वभूमीवर भाजप आता चांगलीच आक्रमक झाली आहे. भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राज्यात ‘तक्रारदार स्थानबद्ध आणि गावगुंड राज्यभर मुक्त’, अशी स्थिती निर्माण झाल्याचा घणाघाती आरोप शेलार यांनी केलाय. (Ashish Shelar criticizes CM Uddhav Thackeray over Obstacle to Kirit Somaiya)

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यानंतर सोमय्या कोल्हापूर जिल्ह्यात मुश्रीफ यांच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी जात होते. त्यावेळी सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप भाजपनं केलाय. राज्य अराजकतेकडे जात आहे. पत्रकार, संपाद, जाणकार, बुद्धिजीवी वर्ग, सामान्य नागरिकांनी आता बोललं पाहिजे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करुच, पण आता सर्वसामान्य नागरिकांनी बोलणं गरजेचं असल्याचं शेलार म्हणाले.

आशिष शेलारांकडून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती

किरीट सोमय्या यांनी आधीच सांगितलं की अमूक एका ठिकाणी तक्रार नोंदवण्यासाठी जाणार आहे. त्यावेळी काल मुंबईत शंभर सव्वाशे पोलीस नीलम नगरला घेराव घावून होते. हा पोलिसांचा गैरवावर नाही का? असा सवालही शेलारांनी केलाय. नोटीस म्हणून जी दाखवली जात होती, ती चुकीची आणि बोगस होती. इतकी गंभीर गोष्ट आहे की एका नागरिकाला, एका नेत्याला, एका माजी खासदाराला खोटी आणि बोगस नोटीस दाखवली जाते. ज्या जिल्ह्यातून ही नोटीस काढली असं सांगितलं जातं त्या पोलिसांनी मुंबईतील लोकल पोलिसांकडे एन्ट्री केली होती का? सोमय्यांना नोटीस दाखवण्याची पद्धत आणि खऱ्या नोटीसला उशीर का झाला? अशी प्रश्नांची सरबत्तीच शेलार यांनी यावेळी केली.

उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशीची मागणी

गुन्हे गार कोण हे माहिती आहे. कायदा आणि सुव्यवस्था कोण हाती घेईल हे माहिती आहे, तो कुठल्या पक्षाचा हे ही माहिती आणि मग कारवाई कुणावर आणि अटकाव कुणाला करताय? एकप्रकारे सरकारी यंत्रणेनं गुन्हा केला आहे. काही बातम्या समोर आल्या त्यात शिवसेनेचे नेते म्हणतात की मुख्यमंत्र्यांना अवगत केलं गेलं नव्हतं. त्यामुळे हे प्रकरण गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाची माननीय मुख्यमंत्र्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज शेलार यांनी भाजपच्या वतीनं केली आहे.

‘आता मुख्यमंत्र्यांनी म्हणावं,  मी बेजबाबदार…’

मुख्यमंत्री कोरोना काळात म्हणत होते की मी जबाबदार. पण आता मुख्यमंत्र्यांना गोष्टी माहिती नसल्याचं शिवसेनेचे नेते सांगतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता मी बेजबाबदार अशी घोषणा द्यावी, असा खोचक टोलाही शेलार यांनी लगावला आहे.

इतर बातम्या :

सोमय्यांच्या टार्गेटवर ठाकरेंचे बंगले; अलिबागला जाऊन उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंच्या बंगल्यांची पाहणी करणार

‘देवेंद्र फडणवीस दबंग नेते, शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात!’, भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

Ashish Shelar criticizes CM Uddhav Thackeray over Obstacle to Kirit Somaiya

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.