‘विद्यापीठाचे कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरणार’, कुण्या ‘सचिन वाझे’सारख्याला कुलगुरू करणार का? शेलारांचा सवाल 

विद्यापीठ कुलगुरु नेमण्याचा राज्यपालांकडे असलेला अधिकार राज्य शासनाने आपल्याकडे घेतल्‍यामुळे यापुढे राज्यातील विद्यापीठातील कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरवला जाईल. एखाद्या “सचिन वाझे” सारख्या व्यक्तीला कुलगुरू करायचे आहे का? अशा व्यक्तीच्या स्वाक्षरीने विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देणार का? असा खोचक सवाल शेलार यांनी केलाय.

'विद्यापीठाचे कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरणार', कुण्या 'सचिन वाझे'सारख्याला कुलगुरू करणार का? शेलारांचा सवाल 
उद्धव ठाकरे, आशिष शेलार
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 7:39 PM

मुंबई : विद्यापीठाच्या (University) कुलगुरू (Vice Chancellor) पदाच्या निवडीबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर आता भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी जोरदार टीका केलीय. विद्यापीठ कुलगुरु नेमण्याचा राज्यपालांकडे असलेला अधिकार राज्य शासनाने आपल्याकडे घेतल्‍यामुळे यापुढे राज्यातील विद्यापीठातील कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरवला जाईल. एखाद्या “सचिन वाझे” सारख्या व्यक्तीला कुलगुरू करायचे आहे का? अशा व्यक्तीच्या स्वाक्षरीने विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देणार का? असा खोचक सवाल शेलार यांनी केलाय.

शेलार म्हणाले की, मंत्रिमंडळ बैठकीत काल निर्णय झाला. त्यामध्ये महाराष्‍ट्र सार्वजनीक विद्यापीठ कायद्या 2016 मध्ये बदल केले असुन कलम 9(अ) हे नवीन कलम टाकून राज्यपालांचे अधिकार काढून घेण्याचे काम सरकारने केले आहे. पुर्वीच्‍या कायद्यानुसार कुलगुरू निवड करण्‍यासाठी राज्‍यपाल शोध समिती गठीत करीत असत ज्‍या समितीमध्‍ये सवोच्‍च न्‍यायालयाचे निवृत्‍त न्‍यायमुर्ती किंवा उच्‍च न्‍यायालयातील निवृत्‍त न्‍यायाधीश, बरोबरीने शिक्षण तज्ञ, पद्म पुरस्‍कार प्राप्‍त यासह उच्‍च शिक्षण विभागाचे सचिव अशी कमिटी गठीत करून ही समिती कुलगुरुपदासाठी अर्जदार व्‍यक्‍तींच्‍या कागदत्रांची छाननी करून त्‍यातील पाच नावांची शिफारस राज्‍यपालांना करीत असे. ठाकरे सरकारला हे मान्‍य नाही. निवृत्‍त न्‍यायमुर्ती, शिक्षण तज्ञ हे काहीही मान्‍य नाही.

‘आता कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरवले जातील’

तर नवीन बदलानुसार आता कुलगुरू नियुक्‍तीसाठी सरकार एक समिती गठीत करणार आहे. त्‍यातील सदस्‍यही राज्‍य सरकारच ठरवणार आहेत. त्‍या समितीकडून जी नावे सुचविली जातील त्‍यातील दोन नावे कुलपती म्‍हणून राज्‍यपालांकडे मांडली जाणार आहेत. याचा सरळसरळ राजकीय अर्थ असा आहे की, यापुढे राज्यातील विद्यापीठातील कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरवले जातील. यापुर्वी ठाकरे सरकारने केलेल्‍या नियुक्‍त्‍या पाहता एक नवीन सचिन वाझे विद्यापीठात नियुक्‍त करण्‍यात यावा, यासाठी हे अधिकार राज्‍य शासनाने आपल्‍याकडे घेतले आहेत, असा गंभीर आरोप शेलार यांनी केलाय.

‘विद्यापीठांच्‍या निधीवर आक्रमण करण्यासाठी एक पाऊल पुढे’

जो राजाबाई टॉवर एक काळ इंग्रजांसमोरही दिमाखात उभा राहिला त्‍या राजाबाई टॉवरला मंत्रालयासमोर झुकवण्‍याचे काम ठाकरे सरकार करते आहे. हाच अहंकार ठाकरे सरकारचा आहे. मी ठरवेन तेच धोरण मीच बांधेन तेच तोरण हीच ठाकरे सरकारची कार्यपध्‍दती आहे. विद्यापीठांच्‍या स्‍वायत्‍तेवर हे आक्रमण आहे. हे नव्‍याने नसून यापुर्वी ज्‍यावेळी अंतीम वर्ष विद्यार्थ्‍यांच्‍या परिक्षांच्‍या विषयात ही असाच अहंकारी निर्णय घेण्‍यात आला होता. यापुर्वी विद्यापीठाच्‍या निविदांमध्‍ये सुध्‍दा हस्‍तक्षेप करण्‍यात आला होता. विद्यापीठातील प्राध्‍यापक मंत्री कार्यालयात घेऊन पगार मात्र विद्यापीठाने द्यावे असेही करण्‍यात आले. अशा प्रकारे विद्यापीठांच्‍या निधीवर आक्रमण करण्‍यात आली असून आता एक पाऊल पुढे टाकण्‍यात आले आहे, अशी टीकाही त्यांनी केलीय.

भूखंड लाटण्यासाठी कायद्यात बदल करण्यास सुरुवात

मुंबई विद्यापीठाचे करोडो रुपयांचे मोकळे भूखंड लक्ष्य करण्याचे काम ठाकरे सरकारचे आहे. भूखंड लाटण्यासाठी असे कायदा बदल करण्यास सुरुवात झाली आहे”, असा आरोप शेलार त्यांनी केलाय. काही बातम्‍या त्‍याबाबत आल्‍या आहेत. एसआरएसाठी भूखंड देणे, काही रजिस्‍टर, तर काही रजिस्‍टर नसलेल्‍या संस्‍थांना भूखंड देणे सुरू आहे. त्‍यामुळे आपल्‍या मर्जीतील कुलगुरू विद्यापीठात बसविले जात असून भूखंड लाटण्‍यासाठी केलेले हे बदल आहेत, असा गंभीर आरोप शेलार यांनी केला आहे.

भाजपच्या युवा मोर्चाकडून विद्यापीठ बचाव हा कार्यक्रम घेण्यात येईल. मा. मंत्री महोदय तुम्ही घेतलेले सर्व निर्णय अधिकारांचे विकेंद्रीकरण करणारे आहेत, केंद्रीकरण करणारे आहेत, विद्यापीठांची गुणवत्‍ता कशी वाढेल याबाबत कधी चर्चा का केली नाही, असा सवालही त्‍यांनी केला. हा विद्याठावांवर हा घाला असून महाराष्‍ट्रातील नागरीकांनी या विरोधात व्‍यक्‍त व्‍हायला हवे, असे आवाहनही त्यांनी केलंय.

इतर बातम्या :

ठाकरे सरकारनेच ओबींसीच्या राजकीय आरक्षणाचा खून केला, आशिष शेलारांचा हल्लाबोल

नवीन वर्षांच्या स्वागताचा प्लॅन काय? समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जाणार असाल तर या टिप्स नक्की वाचा

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.